(फोटो सौजन्य: Pinterest)
नवरात्रोत्सव सुरू होताच देशभरातील दुर्गामंदिरांमध्ये भक्तांची प्रचंड गर्दी दिसून येते. कानपूरसह संपूर्ण उत्तर भारतात या दिवसांना विशेष महत्त्व आहे. कानपूरच्या घाटमपूर येथे असलेले मां कुश्मांडा देवीचे शक्तिपीठ हे भक्तांच्या प्रचंड श्रद्धेचे केंद्र आहे. नवरात्रात तर येथे येणाऱ्या भाविकांची संख्या हजारोंमध्ये पोहोचते.
नवरात्रात दूरदूरून येतात भाविक
कुश्मांडा देवी मंदिर देशातील सर्वात मोठ्या शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. त्यामुळे नवरात्राच्या काळात येथे भाविकांची अतोनात गर्दी होते. महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान अशा अनेक राज्यांतून लोक येथे दर्शनासाठी येतात. नवरात्राच्या चौथ्या दिवशी येथे विशेष दीपदान कार्यक्रम आयोजित केला जातो. या दिवशी 21 हजारांहून अधिक दिव्यांनी संपूर्ण मंदिर परिसर उजळून निघतो आणि वातावरण भक्तिमय होते.
माता कुश्मांडा देवीचे अद्वितीय स्वरूप
या मंदिराची सर्वात मोठी खासीयत म्हणजे येथे असलेली दोन मुखांची माता. देवीचे हे स्वरूप स्वतः जमिनीतून प्रकट झाले असल्याची मान्यता आहे. जगभरातील हे एकमेव असे मंदिर आहे जिथे द्विमुखी कुश्मांडा देवीचे पूजन केले जाते. त्यामुळे या मंदिराला अद्वितीय आध्यात्मिक स्थान प्राप्त झाले आहे.
नेत्ररोगांवर मिळते अद्भुत लाभ
मंदिराच्या पायथ्याशी सतत नीर (पाणी) वाहते. श्रद्धेनं हे नीर डोळ्यांत लावल्यास नेत्ररोग दूर होतात, अशी मान्यता आहे. अनेक भक्तांनी प्रत्यक्ष अनुभव घेतल्याचे सांगितले जाते. डॉक्टरांनी ज्यांना अंधत्वाची शक्यता व्यक्त केली होती, अशा लोकांनी देखील येथे येऊन या नीराचा स्पर्श केल्यावर दृष्टी सुधारल्याचा अनुभव मांडला आहे. त्यामुळे दरवर्षी असंख्य नेत्ररुग्ण येथे आशेने येतात. दर्शनानंतर लोक माता कुश्मांडा देवीच्या चरणी नेत्रदान देखील करतात.
देशातील या राज्यात वसलंय देवी शैलपुत्रीच प्राचीन मंदिर; नवरात्रीत भक्तांना देते साक्षात दर्शन
प्राचीनतेने भारलेले मंदिर
कुश्मांडा देवीचे हे मंदिर अत्यंत प्राचीन असून शेकडो वर्षांपासून येथे पूजाअर्चा सुरू आहे. येथील पुजाऱ्यांच्या मते, केवळ दर्शन केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. नवरात्रात तर वातावरण अधिकच दैवी आणि पवित्र होते. भक्तांच्या आरत्या, ढोल-ताश्यांचा गजर आणि हजारो दीपांच्या प्रकाशात मंदिर परिसर दैवी ऊर्जा पसरवत असतो. कानपूरच्या घाटमपूरमधील हे शक्तिपीठ केवळ धार्मिक आस्था नव्हे तर लोकांच्या आयुष्यात आशेचा किरण बनले आहे. माता कुश्मांडा देवीच्या चरणी शरण आलेल्या प्रत्येक भक्ताला येथे समाधान, श्रद्धा आणि चमत्काराचा अनुभव मिळतो.