पोटात गाठ झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' भयानक लक्षणे
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, शरीरात होणारे छोटे मोठे बदल, जंक फूडचे सेवन, अपुरी झोप, बिघडलेली पचनक्रिया इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीरात सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिसणाऱ्या छोट्या मोठ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. पोटासंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक लोक अपचन किंवा ऍसिडीटी समजून दुर्लक्ष करतात. मात्र असे न करता शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे लक्ष देऊन आरोग्याची काळजी घ्यावी. पोटात दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर मेडिकलमध्ये उपलब्ध असलेल्या गोळ्यांचे किंवा पेनकिलरचे सेवन केले जाते. पण या गोळ्यांचे वारंवार सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.(फोटो सौजन्य – istock)
आहारात सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे पोट आणि आतड्यानां हानी पोहचण्याची शक्यता असते. याशिवाय बऱ्याचदा पोटात अल्सर झाल्यानंतर लहान आतडयांना जखम किंवा गाठ होण्याची शक्यता असते. या गाठीमुळे पोटात अतिशय तीव्र वेदना वाढू लागतात. या समस्येवर वेळीच उपचार केल्यास पोटात वाढलेली गाठ कमी होण्यास मदत होईल. आज आम्ही तुम्हाला पोटात गाठ झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू लागल्यानंतर शरीरात दिसून येणारे प्रमुख लक्षण म्हणजे अचानक वजन कमी होणे. वजन कमी झाल्यानंतर शरीर अतिशय बारीक वाटू लागते. तसेच पोटात अल्सर झाल्यानंतर शरीराची भूक अतिशय कमी होते. कोणताही पदार्थ खाण्याची किंवा पिण्याची इच्छा होत नाही. बऱ्याचदा शरीरात दिसून येणाऱ्या या समस्येकडे दुर्लक्ष केले जाते, पण असे न करता तातडीने उपचार करून आराम मिळवावा. शरीरात दीर्घकाळ दिसणाऱ्या कोणत्याही लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.
पोटात गाठ तयार झाल्यानंतर शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास शरीरात अनेक बदल दिसून येतात. पोटात अल्सर किंवा गाठ झाल्यानंतर जेवलेले अन्नपदार्थ सहज पचन होत नाहीत. याशिवाय उलट्या किंवा मळमळ वाटू लागते. त्यामुळे शरीरात सतत उलट्या मळमळ वाटू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.
पाठीत भरलेली चमक तात्काळ उतरेल! पाठदुखीच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी ‘हे’ उपाय ठरतील गुणकारी
पोटासंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर पोटाच्या वरच्या भागात वेदना होऊ लागतात. या वेदनांकडे अनेक लोक ऍसिडिटी समजून दुर्लक्ष करतात. मात्र असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. पोटात अल्सर किंवा गाठ झाल्यानंतर पोटाच्या वरच्या भागात वेदना वाढू लागतात. या वेदनांवर उपचार मिळवण्यासाठी औषध उपचार करावे.