रात्री झोपण्याआधी करा 'या' गोड पदार्थाचे सेवन, सांधेदुखी होईल गायब
दैनंदिन आहारात अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते.जेवणात कधी तिखट, मसालेदार, आंबट गोड पदार्थ खाल्ले जातात. त्यात आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक असलेला पदार्थ म्हणजे गूळ. गूळ खाल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. याशिवाय यामध्ये असलेल्या घटकांमुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. शरीरात साचलेल्या विषारी घटकांमुळे अपचन, मळमळ, उलट्या इत्यादी अनेक आरोग्यासंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. नियमित आहारात गूळ आणि फुटाण्यांचे सेवन केल्यामुळे शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतात. हे पदार्थ आरोग्यासाठी वरदान ठरतात. वय वाढल्यानंतर शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपणा कमी करण्यासाठी गूळ फुटण्याचे सेवन करावे. यामुळे शरीर निरोगी राहते.(फोटो सौजन्य – istock)
पाठीत भरलेली चमक तात्काळ उतरेल! पाठदुखीच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी ‘हे’ उपाय ठरतील गुणकारी
धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक लोक आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देत नाहीत. मात्र असे केल्यामुळे छोटे आजार मोठे स्वरूप घेतात आणि आरोग्याला हानी पोहचते. फुटाण्यांमध्ये प्रोटीन आणि फायबर भरपूर असतात. आज आम्ही तुम्हाला रात्री झोपण्याआधी गूळ फुटाण्यांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थाचे आहारात नियमित सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतात.
चण्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. रोजच्या आहारात सतत जंक फूड, मसालेदार, तेलकट तिखट पदार्थ खाल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. शरीरात विषारी घटक तसेच साचून राहिल्यामुळे अपचन, गॅस किंवा आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी रात्री झोपताना गूळ आणि फुटाण्यांचे सेवन करावे. यामुळे आतड्यांची हालचाल सुधारण्यास मदत होते.
बऱ्याचदा साथीच्या आजारांमुळे किंवा इतर कोणत्याही गंभीर आजारांमुळे शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात चणे आणि गुळाचे सेवन करावे. चणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी ठरतात. लहान मुलांना सतत भूक लागते. अशावेळी कोणत्याही तेलकट किंवा तिखट पदार्थ देण्याऐवजी चणे आणि गूळ खाण्यास द्यावे. चणे आणि गूळ नियमित खाल्यास शरीराला ऊर्जा मिळते.
शरीरात निर्माण झालेली हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढण्यासाठी चणे आणि गूळ खावे. यामुळे शरीरात निर्माण झालेला थकवा आणि अशक्तपणा कमी होतो. ऍनिमिया असलेल्या व्यक्तींसाठी गूळ अतिशय प्रभावी ठरेल. यामध्ये असलेल्या लोहामुळे शरीराला ऊर्जा मिळते. रक्त शुद्ध करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित गूळ आणि फुटाण्यांचे सेवन करावे.