Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uric Acid वाढल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘हे’ बदल, दुर्लक्ष केल्यास उद्भवेल संधिवाताची समस्या

शरीरात यूरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यानंतर सांध्यांमध्ये वेदना होणे, संधिवात किंवा आरोग्यासंबंधित इतरही समस्या उद्भवू लागतात. यूरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यानंतर शरीरात ही गंभीर लक्षणे दिसून येतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 21, 2025 | 05:30 AM
यूरिक अ‍ॅसिड वाढल्यानंतर शरीरात दिसून येणारे बदल

यूरिक अ‍ॅसिड वाढल्यानंतर शरीरात दिसून येणारे बदल

Follow Us
Follow Us:

हवामानात होणारे बदल, अपुरी झोप, जंक फूडचे अतिसेवन, कामाचा वाढलेला तणाव, वारंवार बिघडलेल्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीरात बऱ्याचदा अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. मात्र या लक्षणांकडे अनेक लोक दुर्लक्ष करतात. पण असे केल्यामुळे हेच छोटे आजार मोठे होतात. शरीरात यूरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यानंतर संधिवाताची समस्या उद्भवू लागते. यूरिक अ‍ॅसिड वाढल्यानंतर मुतखड्याचा त्रास होण्याची जास्त शक्यता असते. यूरिक अ‍ॅसिड रक्तामध्ये जमा होऊ लागल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. चुकीच्या जीवनशैलीचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. यूरिक अ‍ॅसिड शरीरात निर्माण होणारा टाकाऊ पदार्थ आहे. यामुळे शरीराच्या कोणत्याही अवयवांमध्ये खड्डे साचण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)

सौदी अरेबियाचे ‘स्लीपिंग प्रिन्स’ यांचे २० वर्ष कोमात राहिल्यानंतर निधन, जाणून घ्या कोमात जाण्याची कारणे

शरीरात यूरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यानंतर हळूहळू रक्तात यूरिक अ‍ॅसिड वाढून खड्डे तयार होऊ लागतात. मेडिकल भाषेत याला हायपरयुरिसेमिया असे म्हणतात. रक्तात मोठ्या प्रमाणावर यूरिक अ‍ॅसिड तयार झाल्यानंतर हळूहळू हाताच्या बोटांमध्ये किंवा पायांच्या बोटांमध्ये क्रिस्टल तयार होऊ लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. शरीरात दिसणाऱ्या या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

यूरिक अ‍ॅसिड वाढल्यानंतर शरीरात दिसून येणारे बदल:

गाउट किंवा असह्य सांधेदुखी:

शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढल्यानंतर ते सांध्यांमध्ये साचून राहते. ज्यामुळे हाडांमध्ये वेदना वाढू लागतात. जेव्हा यूरिक अ‍ॅसिडचे क्रिस्टल्स सांध्यांमध्ये प्रवेश करतात, ज्यामुळे संधिवात किंवा गाऊट होण्याची शक्यता असते. बऱ्याचदा या वेदना अतिशय तीव्र होऊन जातात. ज्यामुळे चालताना किंवा कोणतीही हालचाल करताना वेदना होऊ लागतात. पायाची बोटे, घोटे, गुडघे आणि बोटांमध्ये युरिक ऍसिड साचून राहते.

मूतखडा:

हल्ली अनेकांना मुतखड्याची समस्या उद्भवू लागली आहे. लघवीसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक लोक दुर्लक्ष करतात, मात्र असे न करता तातडीने उपचार करणे आवश्यक आहे. क्रिस्टलची समस्या केवळ सांध्यांमध्येच नाहीतर मूत्रपिंडातही साचून राहण्यास सुरुवात होते.यामुळे मूत्रपिंडांवरभार येतो, ज्यामुळे लघवी करताना जळजळ होणे, वेदना होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू शकतात.

छातीमध्ये जमा झालेला कफ होईल कायमचा नष्ट! ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, फुफ्फुसांमधील घाण जाईल बाहेर

हृदयरोगाचा धोका:

शरीरातील अतिशय नाजूक अवयव म्हणजे हृदय. हृदयाच्या कार्यात कोणताही अडथळा निर्माण झाल्यानंतर संपूर्ण शरीराला हानी पोहचते. यूरिक ऍसिडची पातळी वाढल्यानंतर रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. ज्यामुळे रक्तवाहिन्यांच्या आतील स्तराचे नुकसान होते. तसेच रक्तवाहिन्यांमधील लवचिकता कमी होऊन जाते.

FAQs (संबंधित प्रश्न)

युरिक ऍसिड म्हणजे काय?

युरिक ऍसिड हे एक नैसर्गिक रसायन आहे, जे शरीर प्युरिन नावाचे पदार्थ (शरीरात तयार होणारे आणि काही पदार्थांमध्ये आढळणारे) पचन करते तेव्हा तयार होते.

युरिक ऍसिडची पातळी वाढल्यास काय होते?

युरिक ऍसिडची पातळी वाढल्यास (हायपरयुरिसेमिया) गाउट (एक प्रकारचे संधिवात) आणि किडनी स्टोन सारख्या समस्या उद्भवू शकतात.

युरिक ऍसिडची पातळी वाढल्यास कोणती लक्षणे दिसतात?

सांध्यांमध्ये वेदना आणि सूज (विशेषतः मोठ्या पायाच्या बोटात), सांध्यांभोवती लालसरपणा किंवा त्वचेला चमक येणे, किडनी स्टोनची लक्षणे. रक्ताची आणि लघवीची तपासणी करून युरिक ऍसिडची पातळी तपासता येते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: These changes are seen in the body after the increase of uric acid what is uric acid

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • health care news
  • uric acid
  • Uric Acid Remedies

संबंधित बातम्या

Health Care Tip: धाप लागण्यामागे फिटनेसची कमतरता की फुफ्फुसांचा आजार? जाणून घ्या शरीरसंबंधित आजाराचे संकेत
1

Health Care Tip: धाप लागण्यामागे फिटनेसची कमतरता की फुफ्फुसांचा आजार? जाणून घ्या शरीरसंबंधित आजाराचे संकेत

Postpartum Weight Loss: प्रसूतीनंतर लगेच वजन कमी करताय? सावधान! ‘या’ आहारावर अधिक द्या भर
2

Postpartum Weight Loss: प्रसूतीनंतर लगेच वजन कमी करताय? सावधान! ‘या’ आहारावर अधिक द्या भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.