सौदी अरेबियाचे 'स्लीपिंग प्रिन्स' यांचे २० वर्ष कोमात राहिल्यानंतर निधन,
सौदी अरेबिया आणि अरब जगात ”झोपेचा राजकुमार” म्हणून ओळखले जाणारे प्रिन्स अल-वलीद बिन खालेद बिन तलाल बिन अब्दुल अझीझ अल सौद यांचे 19 जुलैला वयाच्या 36 व्या वर्षी निधन झाले. मागील 20 वर्षांपासून प्रिन्स अल-वलीद बिन खालेद बिन तलाल बिन अब्दुल अझीझ अल सौद हे कोमात होते. मात्र अखेर 19 जुलैला त्यांचे निधन झाले. रॉयल कोर्टाने सौदी प्रेस एजन्सीद्वारे त्यांच्या मृत्यूची घोषणा केली आहे. त्यांच्या निधनामुळे सौदी राजघराण्याच्या आयुष्यातील एका दीर्घ आणि खोल भावनिक अध्यायाचा अंत झाला आहे.त्यांनी संपूर्ण प्रदेशात प्रार्थना, सहानुभूतीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांच्या मृत्यूमुळे दुःखद प्रवासाचा शेवट झाला. 2005 मध्ये झालेल्या गंभीर कार अपघातामध्ये प्रिन्स अल-वलीद कोमात गेले होते. 20 वर्ष कोमात राहिल्यानंतर त्यांचा अखेर मृत्यू झाला.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
प्रिन्स अल-वलीद हे प्रिन्स खालेद बिन तलाल अल सौद यांचे ज्येष्ठ पुत्र आणि अब्जाधीश उद्योगपती प्रिन्स अल-वलीद बिन तलाल यांचे पुतणे होते. त्यांचा जन्म 1990 मध्ये झाला होता. तरुण वयात लष्करी शिक्षण घेण्यासाठी ते लंडनमध्ये गेले होते. त्यावेळी ते फक्त 15 वर्षांचे होते. लंडनमध्ये झालेल्या अपघातात मेंदूत रक्तस्त्राव झाला आणि अंतर्गत दुखापत झाली. ज्यामुळं मागील अनेक वर्षांपासून ते कोमात होते. आज आम्ही तुम्हाला अपघातानंतर व्यक्तीला कोमात का जातात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
बऱ्याचदा आपल्याला कानावर पडते की, रस्ते अपघातानंतर व्यक्ती कोमात गेली. याचा संबंध कधी हाय ब्लडप्रेशर, शुगर, हृदयाशी संबंधित प्रदीर्घ दुखण्यामुळे मेंदूला रक्त पुरवठा आणि ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थित न झाल्यामुळे पेशंट कोमामध्ये जाण्याची शक्यता असते. वारंवार होणाऱ्या रस्ते अपघातांमध्ये अनेक लोक कोमात जातात. कारण मेंदूला होणाऱ्या गंभीर दुखापतीमुळे ही समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. कोमात जाणे हा कोणताही आजार नसून मेंदूला झालेल्या गंभीर दुखापती लक्षण आहे.
किडनी स्टोन झाल्याची लक्षणे कोणती? काय आहेत उपाय? जाणून घ्या कारणं
मेंदूतील रेटिक्युलर अॅक्टीव्हेटींग सिस्टम व्यक्तीच्या जागृतावस्थेवर कायमच नियंत्रण ठेवत असते. त्यामुळे शरीराचे सर्वच स्नायू व्यवस्थित काम करतात. विचार करणे, वाचन, लिखाण इत्यादी अनेक गोष्टींवर नियंत्रण ठेवले जाते. रेटिक्युलर अॅक्टीव्हेटींग सिस्टमला ज्यावेळी दुखापत होते, त्याक्षणी व्यक्ती कोमात जाण्याची लक्षणे शरीरात दिसून येतात. यामुळे बऱ्याचदा मृत्यू होण्याची जास्त शक्यता असते. कोमात गेलेली व्यक्ती शुद्धीत येण्यासाठी बऱ्याच वर्षांचा कालावधी लागतो तर काहींचा कोमात असतानाच मृत्यू होतो.