
अॅबॉटकडून नवीन- प्रगत एन्शुअर डायबिटीज केअर लाँच!
जगभरात मधुमेहाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जीवनशैलीतील बदलांचा परिणाम आरोग्यावर झाल्यानंतर संपूर्ण शरीराला हानी पोहचते. रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे शरीरात मधुमेह होण्याआधी दिसणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता तातडीने औषध उपचार करणे आवश्यक आहे. मधुमेहाचे दोन प्रकार आहे. मधुमेह हा कधीच न बरा होणारा आजार आहे. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. बऱ्याचदा धावपळीच्या जीवनशैलीमुळे शरीराकडे लक्ष देण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. यामुळे शरीराला वेगवेगळ्या गंभीर आजारांची लागण होते आणि शरीर कमकुवत होऊन जाते.(फोटो सौजन्य – istock)
अॅबॉट या जागतिक आरोग्यसेवा कंपनीने आज ‘एन्शुअर डायबिटीज केअर’च्या नवीन व प्रगत सूत्रीकरणाच्या लाँचची घोषणा केली. ३० वर्षांहून अधिक काळाच्या अग्रणी वैज्ञानिक पोषणावर आधारित आणि ६० हून अधिक वैद्यकीय चाचण्यांचे पाठबळ असलेली ही नाविन्यता मधुमेह असलेल्या व्यक्तींना उत्तम जीवन जगण्यास सक्षम करते.
या सूत्रीकरणामध्ये ट्रिपल केअर सिस्टमसह महत्त्वाचे पौष्टिक घटक, तसेच ४ पट उच्च मायो-इनोसिटॉल*, कमी ग्लायसेमिक इंडेक्स कार्बोहायड्रेट संयोजन आहे, जे संथ गतीने ऊर्जा सोडण्यासाठी आणि रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्यास कमी करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. उच्च दर्जाचे प्रथिने व उच्च फायबरसह संयोजित हे पौष्टिक घटक एकत्रित रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यास, कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि वजनाचे व्यवस्थापन करण्यास मदत करतात. तसेच यामुळे वजन कमी होत असताना स्नायूंचे जतन करण्यास देखील मदत होते, शरीरातील चरबी मोठ्या प्रमाणात कमी होते, यकृत आणि स्वादुपिंड सारख्या अवयवांभोवती पोटात खोलवर साठलेले व्हिसेरल फॅट देखील कमी होते. हे फॅट्स हृदय संबंधित आजार, टाइप २ मधुमेह आणि उच्च रक्तदाब असे आजार होण्यास कारणीभूत आहेत.
आज, जागतिक स्तरावर मधुमेह झपाट्याने वाढत असलेले आरोग्यसंबंधित आव्हान आहे, जेथे ५८९ दशलक्ष प्रौढ व्यक्ती मधुमेहासह जगत आहेत आणि ही आकडेवारी २०५० पर्यंत ८५३ दशलक्षपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. मधुमेहासह जगणाऱ्या १०१ दशलक्ष व्यक्तींसह भारत मधुमेहाच्या प्रादुर्भावातच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्रमाणित सोल्यूशन्ससोबत मधुमेह व्यवस्थापनामध्ये पोषणाच्या आवश्यक भूमिकेवर लक्ष केंद्रित केल्यास हा भार कमी होण्यास मदत होऊ शकते.
पोषण व ग्लायसेमिक नियंत्रण महत्त्वाचे घटक आहेत, ज्यांचे व्यवस्थापन आव्हानात्मक ठरू शकते. ग्लायसेमिक नियंत्रणामधून व्यक्ती त्यांच्या रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण आरोग्यदायी श्रेणीमध्ये कशाप्रकारे ठेवू शकते, हे दिसून येते. चारपैकी तीन मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये पौष्टिक सवयी , अनुवांशिक पूर्वस्थिती आणि जीवनशैली यांसारख्या विविध घटकांमुळे ग्लायसेमिक नियंत्रण कमी असते.
अॅबॉटच्या आशिया-पॅसिफिक न्यूट्रिशन आरअँडडी सेंटरमधील वैद्यकीय विज्ञान व पोषणाच्या वरिष्ठ प्रमुख पीएच.डी. अॅग्नेस सिव लिंग टे म्हणाल्या, ”मधुमेह-संबंधित पौष्टिक सूत्रे मधुमेह व्यवस्थापनाचा आधारस्तंभ आहे. वैज्ञानिक पुराव्यामधून निदर्शनास येते की ही सूत्रे ग्लायसेमिक नियंत्रण मोठ्या प्रमाणात सुधारू शकतात, कार्डिओमेटाबोलिक जोखीम कमी करू शकतात आणि वजन व्यवस्थापनामध्ये मदत करू शकतात. जीवनशैली हस्तक्षेपांमध्ये समाविष्ट केल्यास ही सूत्रे मधुमेहासह जगणाऱ्या व्यक्तींसाठी दीर्घकाळापर्यंत आरोग्य उत्तम ठेवण्याकरिता शक्तिशाली साधन देतात.”
त्या पुढे म्हणाल्या, ”मधुमेह व्यवस्थापनासाठी योग्य पौष्टिक योजना अवलंबणे जीवनाचा दर्जा सुधारण्याचा महत्त्वपूर्ण भाग आहे, पण हे सोपे नाही. एन्शुअर डायबिटीज केअरचे नवीन व प्रगत सूत्रीकरण विज्ञानाचे पाठबळ असलेले व सोईस्कर सोल्यूशन आहे, जे मधुमेह असलेल्या व्यक्तींना त्यांची जीवनशैली समायोजित करण्यास आणि आरोग्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.”
नवीन एन्शुअर डायबिटीज केअर सूत्रीकरणामध्ये मधुमेह व्यवस्थापनासह मदत करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या घटकांचे प्रगत संयोजन आहे. नवीन सूत्रीकरणामध्ये पुढील गोष्टी आहेत:प्रगत हळू पचन होणाऱ्या कार्बोहायड्रेटसह ४ पट अधिक इनोसिटॉल*, जे रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करण्यास मदत करते. विरघळणाऱ्या व न विरघळणाऱ्या फायबर्सचे (ओट फायबर) दुहेरी संयोजन, जे पचनसंस्थेचे आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत करते.
उत्तम जीवाणूंच्या वाढीला चालना देण्यासाठी आणि पचनसंस्थेचे आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत करण्यासाठी प्रीबायोटिक एफओएस (फ्रुक्टोलिगोसॅकराइड्स). कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कार्डिओव्हॅस्कुलर आरोग्य उत्तम राहण्यासाठी हृदयाचे आरोग्य उत्तम ठेवणा-या फॅटचे संयोजन आणि ट्रान्स-फॅट मुक्त आहे.हे वैज्ञानिकदृष्ट्या डिझाइन करण्यात आलेले सूत्रीकरण आवश्यक व्हिटॅमिन्स व मिनरल्स देते, तसेच त्यामध्ये अधिक व्हिटॅमिन डी, क्रोमियम, कॅल्शियम व झिंक आहे, जे मधुमेह असलेल्या व्यक्तींच्या पौष्टिक गरजांची पूर्तता करण्यास मदत करतात.सुक्रोज समाविष्ट नाही आणि प्रथिने व फायबर उच्च प्रमाणात आहेत.
भारतातील अॅबॉटच्या पोषण व्यवसायासाठी महाव्यवस्थापक (जनरल मॅनेजर) अनिर्बन बासू म्हणाले, ”भारतातील व जगभरातील लाखो व्यक्तींच्या जीवनात मधुमेहाचा परिणाम होत असताना व्यक्तींना त्यांच्या आरोग्यावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम करणारे सोल्यूशन्स अधिक महत्त्वाचे आहेत. अॅबॉटच्या नवीन व प्रगत एन्शुअर डायबिटीज केअर सूत्रीकरणामधून विज्ञान-आधारित पोषण प्रगत करण्याप्रती कंपनीची कटिबद्धता दिसून येते, जे ग्लायसेमिक नियंत्रण व एकूण स्वास्थ्य उत्तम राखण्यास मदत करते. लक्ष्यित पौष्टिक घटक व वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित घटकांना एकीकृत करत ही नाविन्यता मधुमेह असलेल्या व्यक्तींना आरोग्यदायी, अधिक सक्रिय जीवन जगण्यास मदत करण्याच्या दिशेने अर्थपूर्ण पाऊल आहे.”स्वरूपआवश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी २०० ग्रॅम, ३७५ ग्रॅम, ९५० ग्रॅम, १४२५ ग्रॅम व १९०० ग्रॅम पॅक आकारांमध्ये आणि व्हॅनिला व चॉकलेट या दोन स्वादांमध्ये उपलब्ध आहे.
Ans: तुमच्या शरीरातील पेशींना ऊर्जा मिळवण्यासाठी इन्सुलिन नावाच्या संप्रेरकाची (hormone) गरज असते. इन्सुलिन हे स्वादुपिंड तयार करते.
Ans: नेहमीपेक्षा जास्त तहान लागते.विशेषतः रात्रीच्या वेळी लघवीसाठी वारंवार जावे लागते.
Ans: रक्तातील साखरेची पातळी सामान्यपेक्षा जास्त असते, पण ती टाइप 2 मधुमेहाइतकी जास्त नसते. जीवनशैलीत बदल न केल्यास भविष्यात टाइप 2 मधुमेह होऊ शकतो.