दातांवर जमलेली कॅविटी आणि पिवळेपणा दूर करतील 'हे' घरगुती पदार्थ; काही दिवसांतच पांढरे चमकू लागतील तुमचे दात
सदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी आपण आपल्या शरीराची खूप काळजी घेतो. तसेच सुंदर दिसण्यासाठी आपण आपल्या त्वचेवर नवनवीन उपाय करून पाहत असतो पण यात आपल्या दातांची काळजी मात्र राहून जाते… सुंदर दिसण्यासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी आपले दात देखील निरोगी राहणे गरजेचे आहे. आपण दिवसभरात जे काही खातो त्याने आपले दात खराब होत असतात, ज्यांना स्वच्छतेची गरज असते. दात स्वछ करण्यासाठी आपण टूथब्रश आणि टूथपेस्टचा वापर तर करतो मात्र बऱ्याचदा हे दात नीट स्वछ केले नाही की दातांमध्ये कॅविटी आणि पिवळेपणाची समस्या जाणवू लागते. आपल्या पिवळ्या दातांमुळे आपल्याला नीट खळखळून हसता येत नाही, प्रत्येकाला पांढरे आणि चमकदार दात हवे असतात अशात तुम्ही यासाठी काही घरगुती पदार्थांची मदत घेऊ शकता.
आज आम्ही तुमच्यासाठी काही प्रभावी उपाय घेऊन आलो आहोत ज्यांच्या मदतीने तुमचे दात मोत्यासारखे पांढरे होतील आणि वर्षानुवर्षे साचलेल्या पोकळ्याही हळूहळू नाहीशा होतील. या उपायांचे पालन केल्याने दातांवर जमा होणारा प्लाक देखील नाहीसा होईल. दाताचे उपचार खूप महाग झाले आहेत. एकदा तुम्ही डॉक्टरकडे गेलात की, फक्त बिलच येणार नाही, तर तुम्हाला महागड्या टूथपेस्ट, रसायने आणि इतर उपचारांची एक मोठी यादी देखील दिली जाईल. ज्यामुळे फायदे आणि तोटे दोन्ही होऊ शकतात. अशा परिस्थितीत, आम्ही सांगत असलेल्या घरगुती उपायांनी तुम्ही घरीच तुमचे दात स्वछ आणि पांढरे करू शकता.
बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस
दात स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस एक प्रभावी उपाय ठरतो. यासाठी १ चिमूटभर बेकिंग सोडा घ्या आणि त्यात थोडा लिंबाचा रस मिसळा. टूथब्रशच्या मदतीने ते दातांवर घासून घ्या आणि २ मिनिटे असे करत रहा. आठवड्यातून दोन दिवस असे केल्याने तुमच्या दातांचा पिवळापणा हळूहळू कमी होईल आणि तुमचे घाणेरडे दात काही दिवसांतच चमकू लागतील.
मीठ आणि मोहरीचे तेल
फार पूर्वीपासून दातांच्या समस्येसाठी मीठ आणि मोहरीचे तेल वापरण्यात येत आहे. हा रामबाण उपाय तुमच्या दातांचा पिवळेपणा दूर करू शकतो. मोहरीच्या तेलात थोडे मीठ मिसळून दातांवर लावल्याचे दातांच्या समस्या दूर होतात. यासाठी १ चमचा सैंधव मीठात मोहरीचे तेल मिसळा आणि ते बोटाने किंवा ब्रशने पेस्टसारखे दातांवर चोळा. दररोज असे केल्याने तुम्हाला निश्चितच फरक दिसून येईल.
पायांमध्ये सूज आणि वेदना आहे? मग हे असू शकते या 5 पोषक तत्वांच्या कमतरतेचे लक्षण; वेळीच सावध व्हा
खोबरेल तेलाने ऑइल पुलिंग करा
दातांसाठी ऑइल पुलिंग चांगले मानले जाते. आठवड्यातून १-२ वेळा ऑइल पुलिंग करून दातांचा पिवळापणा दूर करता येतो. यासाठी तोंडात १ चमचा तेल नारळाचे घाला आणि ते १५ मिनिटे तोंडात फिरवत रहा. काही वेळाने तोंड स्वच्छ धुवा आणि तेल काढून टाका. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही यानंतर ब्रश करू शकता. यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होईल.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.