Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लहानपणी ‘या’ समस्यांमुळे वाढू शकतो हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका, पालकांनी जाणून घ्यावे

प्रत्येक मोठा झालेला व्यक्ती पुन्हा एकदा त्याचं लहानपण जगण्याची इच्छा व्यक्त करत असतो. पण जर लहानपणीचा आजार मोठेपणी त्रास देत असेल तर. बालपण आणि पौगंडावस्थेतील उच्च रक्तदाब सारख्या गंभीर समस्यांमुळे भविष्यात हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात ही धक्कादायक बाब समोर आली आहे. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 19, 2024 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us
Close
Follow Us:

हार्ट अटॅक ही एक अशी समस्या आहे जी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जर वेळीस या समस्येकडे लक्ष दिले नाही तर हा आजरा आपल्या जीवावर बेतू शकतो. बदलती लाइफस्टाइल आणि आपला चुकीचा आहार या आजाराला मुख्य कारणीभूत जरी असला तरी बालपणी काही समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा आजार वाढू शकतो.

एका नवीन संशोधनात धक्कादायक खुलासा झाला आहे की बालपणात आणि पौगंडावस्थेतील उच्च रक्तदाबामुळे प्रौढावस्थेत हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकसारखे गंभीर धोके चार पटीने वाढू शकतात. हे संशोधन 1996 ते 2021 दरम्यान कॅनडातील ओंटारियो येथील 25,605 मुले आणि किशोरवयीन मुलांवर करण्यात आले, ज्यांना उच्च रक्तदाबाची समस्या होती.

हे देखील वाचा: अचानक एखाद्या व्यक्तीस Heart Attack आल्यास काय करावे? ‘हा’ उपाय वाचवेल प्राण

संशोधकांना असे आढळून आले की ज्यांना लहानपणापासूनच उच्च रक्तदाबाचा त्रास होता, त्यांना हार्ट अटॅक, स्ट्रोकचा धोका अन्य लोकांच्या तुलनेत दोन ते चार पट जास्त असतो. हे संशोधन कमी वयात उच्च रक्तदाब नियंत्रित करणे आणि त्याचे धोके कमी करण्याचे महत्त्व अधोरेखित करते.

संशोधनातील प्रमुख निष्कर्ष

बालपणातील उच्च रक्तदाबाचा गंभीर परिणाम: संशोधनातून असे दिसून आले आहे की बालपणातील उच्च रक्तदाबाचा पुढे प्रौढ जीवनावर वाईट परिणाम होतो आणि हा हृदयविकाराचा एक प्रमुख घटक आहे.

हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो: अभ्यासात आढळलेल्या मुलांपैकी ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता त्यांना मोठे झाल्यावर हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक किंवा हृदयावरील शस्त्रक्रिया होण्याचा धोका दोन ते चार पट अधिक असल्याचे दिसून आले.

त्यामुळे या लहान आणि किशोरवयीन मुलांमध्ये उच्च रक्तदाब लवकर ओळखणे आणि त्यावर उपचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

पालकांसाठी महत्वाचा संदेश

पालकांनी मुलांच्या आरोग्याबाबत जाणकार राहून त्यांच्या आरोग्याची नियमितपणे तपासणी केली पाहिजे. तुमच्या मुलांमध्ये उच्च रक्तदाबाची लक्षणे आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

Web Title: These problems in childhood can increase the risk of heart attack and stroke parents should know

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2024 | 06:15 AM

Topics:  

  • Health News
  • Stroke

संबंधित बातम्या

Cough Syrup: दोन वर्षांखालील मुलांना कफ सिरप देऊ नका; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा सल्ला
1

Cough Syrup: दोन वर्षांखालील मुलांना कफ सिरप देऊ नका; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा सल्ला

कफ सिरप की विष! Cough syrup प्यायल्याने ११ निष्पाप मुलांचा मृत्यू, दोन सिरपवर तात्पुरती बंदी
2

कफ सिरप की विष! Cough syrup प्यायल्याने ११ निष्पाप मुलांचा मृत्यू, दोन सिरपवर तात्पुरती बंदी

Khan Sir दान करणार मेंदू? असं करता येतं का? स्वतःच केला खुलासा, Video Viral
3

Khan Sir दान करणार मेंदू? असं करता येतं का? स्वतःच केला खुलासा, Video Viral

कुटुंबाला ठेवा सुरक्षित! जगभरात वाढतोय न्युमोकॉक्कल आजार, आरोग्यतज्ज्ञांनी दिला इशारा
4

कुटुंबाला ठेवा सुरक्षित! जगभरात वाढतोय न्युमोकॉक्कल आजार, आरोग्यतज्ज्ञांनी दिला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.