Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prakash Abitkar: ‘गर्भलिंग निदान’ करणाऱ्यांवर मोक्काची टांगती तलवार; कायदा कडक करण्याची तयारी

Prakash Abitkar: राज्यस्तरीय कृती दलाचे काम जिल्हा स्तरापर्यंत पोहचवणे आवश्यक आहे. जेणेकरुन जिल्हा स्तरावरून याबाबत तक्रारी प्राप्त होतील. यासाठी समितीचा कालबद्ध कार्यक्रम ठरविण्यात यावा.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 08, 2026 | 02:35 AM
Health News

Health News

Follow Us
Follow Us:
  • हिवाळी अधिवेशनात ‘पीसीपीएनडीटी’ कायद्यात सुधारणा विधेयक आणणार
  • वारंवार गुन्हा करणा-यांवर मोका लावणार
  • बोगस डॉक्टरांची यादी होणार प्रसिद्ध
मुंबई/Prakash Abitkar: प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान करून स्त्री भ्रुण हत्या करणा-या डॉक्टरांवर कठोर कारवाई होण्यासाठी गर्भधारणा पूर्व व प्रसुतीपूर्व निदानतंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा १९९४ व २००३ मध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. असे गुन्हे करणाऱ्या डॉक्टरांवर लावण्यात येणारे कलम अधिक कठोर करण्यासोबतच, गुन्हेगारांवर मोक्का लावणे, गुन्हे सिद्धता आणि शिक्षा यात बदल करणे आवश्यक असून येत्या हिवाळी अधिवेशनात या कायद्यात सुधारणा विधेयक सादर करण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

गर्भधारणा पूर्व व प्रसुतीपूर्व निदानतंत्रे लिंग निवडीस प्रतिबंध कायदा १९९४ व २००३ च्या कठोर अंलबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृती दलाची पहिली बैठक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली, यावेळी ते बोलत होते. यावेळी कृती दलाच्या अध्यक्ष आमदार डॉ. निलम गोऱ्हे, सदस्य आमदार मनीषा कायंदे, आमदार उमा खापरे, आणि आमदार स्नेहा दुबे -पंडीत व आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर उपस्थित होते.

Health: ‘औषधांच्या गुणवत्तेशी कोणत्याही प्रकारची…’; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांनी दिले ‘हे’ स्पष्ट निर्देश

राज्यस्तरीय कृती दलाचे काम जिल्हा स्तरापर्यंत पोहचवणे आवश्यक आहे. जेणेकरुन जिल्हा स्तरावरून याबाबत तक्रारी प्राप्त होतील. यासाठी समितीचा कालबद्ध कार्यक्रम ठरविण्यात यावा. तसेच या कामासाठी समर्पित अधिकारी आणि कर्मचारी यांचा चमू नेमून देण्यात यावा. नोंदणी नसलेल्या बोगस डॉक्टरांची यादी तयार करून प्रसिद्ध करण्यात यावी जेणेकरून बोगस डॉक्टरांची माहिती नागरिकांना मिळून त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचे काम जनताही करेल. अशा बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही मंत्री आबिटकर यांनी दिले.

सध्या बाजारात सोनोग्राफी करण्यासाठी पोर्टेबल मशीन उपलब्ध आहेत. तशा जाहिराती गुगलवर दिसतात यासंदर्भात सर्वेक्षण करुन अशा उत्पादनावर बंदी घालण्यात यावी. शिवाय पशुंसाठी वापरण्यात येणा-या सोनोग्राफी मशीनचा वापर मनुष्यासाठी होतोय का याची शहानिशा करण्यात यावी. जिल्हास्तरीय समित्यांचा आढावा घेण्यासाठी हिवाळी अधिवेशापूर्वी सर्व जिल्ह्यांमध्ये बैठका घेण्यात याव्यात कायद्याची जनजागृती करणा-यांना अधिक सक्षम व कार्यक्षम करण्यासाठी कार्यशाळा घेण्यात याव्यात अशा सूचनाही आरोग्यमंत्री आबिटकर यांनी केल्या.

डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहताय? जाणून घ्या MBBS कोर्सचा ५.५ वर्षांचा संपूर्ण अभ्यासक्रम आणि वर्षनिहाय माहिती..

Web Title: Bill to amend the pcpndt act to be introduced during the winter session said by prakash abitkar tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Doctors News
  • Health News
  • MCOCA Action
  • Mumbai News
  • Prakash Abitkar

संबंधित बातम्या

Mumbai News : मुंबईकर सावधान! 8 आणि 9 ऑक्टोबरला सायरन वाजणार, प्रशासनाने दिला मोठा अलर्ट
1

Mumbai News : मुंबईकर सावधान! 8 आणि 9 ऑक्टोबरला सायरन वाजणार, प्रशासनाने दिला मोठा अलर्ट

‘नशा ही शरीर आणि समाजाला पोखरणारा…’; Mangal Prabhat Lodha यांचे पालकांना काय आवाहन?
2

‘नशा ही शरीर आणि समाजाला पोखरणारा…’; Mangal Prabhat Lodha यांचे पालकांना काय आवाहन?

राहुल गांधींना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसचा रास्ता रोको, वांद्रे रिक्लेमेशन येथे मध्यरात्री आंदोलन
3

राहुल गांधींना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसचा रास्ता रोको, वांद्रे रिक्लेमेशन येथे मध्यरात्री आंदोलन

Vasai-Virar News: वसई-विरार नाट्यगृहाला ‘मजेटीया’ नाव देण्यास विरोध; ‘या’ नावाची मागणी, आंदोलनाचा इशारा
4

Vasai-Virar News: वसई-विरार नाट्यगृहाला ‘मजेटीया’ नाव देण्यास विरोध; ‘या’ नावाची मागणी, आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.