फोटो सौजन्य: Freepik
गेल्या काही वर्षात हार्ट अटॅक भारतात एक गंभीर समस्या बनत चाली आहे. आधी ही समस्या जेष्ठांमध्ये पाहायला मिळत होती परंतु आता २५ ते ४५ वयोगटातील लोकांमध्ये सुद्धा ही समस्या आढळत आहे. आताची तरुणाई हार्ट अटॅकच्या विळख्यात अडकत चालली आहे, जी खरंच खूप गंभीर बाब आहे.
सोशल मीडियावर तर आपण पाहतोच कसे लोकं व्यायाम, डान्स किंवा गरबा करताना अचानक खाली कोसळतात. एवढेच काय हॉटेलमध्ये जेवण जेवताना सुद्धा लोकांना हार्ट अटॅक येत आहे. अशा परिस्थतीत एक प्रश्न नक्कीच आपल्या मनात येत असतो तो म्हणजे अशा गंभीर प्रसंगी आपण करावे तरी काय जेणेकरून समोरच्या व्यक्तीचे प्राण वाचेल.
जर तुमच्या समोरच्या व्यक्तीला हार्ट अटॅक आला असेल तर सर्वप्रथम त्याला सरळ व सपाट जागेवर झोपवा. ती व्यक्ती बेशुद्ध झाली असेल तर त्याची नाडी तपासा. जर नाडी अजिबात जाणवत नसेल तर समजून घ्या की त्या व्यक्तीला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आहे. कारण हृदयविकाराच्या झटक्यामध्ये हृदयाचे ठोके बंद होतात, त्यामुळे नाडी सापडत नाही.अशा प्रसंगी दोन ते तीन मिनिटांत त्याचे हृदय पुनर्जीवित करणे आवश्यक असते, अन्यथा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्याचा मेंदू खराब होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीस हृदयविकाराचा झटका आल्यास ताबडतोब त्याच्या छातीवर जोरात ठोसा द्या. तो शुद्धीवर येईपर्यंत छातीवर ठोसे देत रहा. या कृतीमुळे त्या व्यक्तीचे हृदय पुन्हा कार्यरत होण्याची किंचित शक्यता आहे.
सीपीआरमध्ये प्रामुख्याने दोन प्रकारे दिला जातो. पाहिलं म्हणजे छाती दाबून तर दुसरं म्हणजे तोंडातून श्वास देऊन. सीपीआर देताना सर्वप्रथम तुमचा हात हार्ट अटॅक आलेल्या व्यक्तीच्या छातीच्या मध्यभागी ठेवा. पंपिंग करताना एका हाताचा तळवा दुसऱ्याच्या वर ठेवा, बोटं घट्ट बंद करा व दोन्ही हात आणि कोपर सरळ ठेवा. त्यानंतर छाती पंप करा जेणेकरून त्या व्यक्तीची छाती दाबली जाईल. असे केल्याने हृदयाचे ठोके पुन्हा सुरू होऊ शकतात. हाताच्या तळव्याने छातीला 1-2 इंचपर्यंत दाबा. हे एका मिनिटात शंभर वेळा करा.