स्तनांचा कर्करोग झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे
कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या अंगावर शहारे येतात. या आजारांचे निदान झाल्यानंतर शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. याशिवाय शरीरात होणाऱ्या बदलांमुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते.कॅन्सर होण्याच्या काही दिवसांआधी शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. शरीरात दिसून येणाऱ्या य लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करणे आवश्यक आहे. अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक-लेखिका ताहिरा कश्यप हिला पुन्हा एकदा ब्रेस्ट कॅन्सरची लागण झाली आहे. तिला सात वर्षांनंतर पुन्हा एकदा कॅन्सरची लागण झाली आहे. ताहिरा कश्यप हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.(फोटो सौजन्य – iStock)
चुकीची जीवनशैली, अपुरी झोप, जंक फूडचे अतिसेवन, व्यायामाचा अभाव, शारीरिक हालचालींची कमतरता इत्यादी इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. त्यामुळे दैनंदिन आहारात शरीरात होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष न करता शरीराला आवश्यक असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
ब्रेस्ट कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येणाऱ्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणे आवश्यक आहे. महिलांनी मासिक पाळीनंतर चाचणी करून घ्यावी. याशिवाय स्तनांमध्ये गाठ किंवा सूज आल्यासारखे वाटू लागल्यास स्वतःच तपासणी कारवी. ब्रेस्ट कॅन्सरचे लागण झाली आहे की नाही हे तपासण्यासाठी मॅमोग्राफी केली जाते. मॅमोग्राफी केल्यानंतर स्तनांच्या आतील अवयवांचा एक्स-रे काढला जातो. तसेच वयाच्या 40 शी नंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. त्यामुळे महिलांनी स्तनांसंबंधित कोणतीही लक्षणे दिसू लागल्यास तपासणी करून घ्यावी. यामुळे स्तनांमध्ये असलेली गाठ आणि मायक्रोकॅल्सीफिकेशन शोधणे सोपे होते.
उन्हाळ्यात सतत एसीमध्ये बसल्यामुळे वाढतो मायग्रेनचा धोका! आरोग्याचे होईल गंभीर नुकसान
मॅमोग्राफी केल्यानंतर स्तनाचा अल्ट्रासाऊंड देखील केला जातो. यामुळे स्तनातून बाहेर पडणाऱ्या द्रवाची किंवा स्तनातून बाहेर काढलेल्या द्रवाची चाचणी केली जाते. ज्यामध्ये कॅन्सरचे निदान झाले आहे की नाही याची काटेकोरपणे तपासणी केली जाते. अनेकदा महिला स्तनांमध्ये येणाऱ्या द्रवाकडे दुर्लक्ष करतात. मात्र असे न करता डॉक्टरांचा साल घेऊन उपचार करावे.