Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल साचून राहिल्यानंतर चेहऱ्यावर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास येईल हार्ट अटॅक

शरीरात वाढलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे हृदयाच्या आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर चेहरा आणि डोळ्यांच्या अवतीभोवती अनेक गंभीर लक्षणे दिसतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 11, 2025 | 11:25 AM
रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल साचून राहिल्यानंतर चेहऱ्यावर दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे

रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल साचून राहिल्यानंतर चेहऱ्यावर दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे

Follow Us
Close
Follow Us:

कोलेस्ट्रॉल हा आरोग्यासाठी घातक आहे. या सायलेंट किलर आजाराची लक्षणे खूप उशिरा दिसून येतात.यामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. चुकीचा आहार, तिखट तेलकट पदार्थांचे सेवन, शरीरात वाढलेला कामाचा तणाव, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू लागते. शरीरात वाढलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. एक म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल आणि दुसरे म्हणजे खराब कोलेस्ट्रॉल.(फोटो सौजन्य – istock)

बद्धकोष्ठतेमुळे आतड्यांमध्ये सडलेली घाण स्वच्छ करण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचा समावेश,आतड्या होतील स्वच्छ

शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल निरोगी पेशी तयार करते. तर वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर संपूर्ण शरीराच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात. शरीराच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर आरोग्यासंबंधित गंभीर आजार उद्भवण्याची जास्त शक्यता असते. शरीरात साचून राहिलेला चिकट पिवळा थर हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक करून टाकतो. यामुळे हृदयाला व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा होत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर चेहऱ्यावर कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

डोळ्यांखाली पिवळे डाग येणे:

शरीरात वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचा परिणाम डोळ्यांवर सुद्धा दिसून येतो. यामुळे डोळ्यांच्या खाली पिवळे डाग दिसू लागतात. या स्थितीला झेंथेलास्मा असे सुद्धा म्हणतात. शरीरात वाढलेल्या उच्च कोलेस्टरॉलमुळे चेहऱ्यावर अनेक समस्या दिसून येतात. चेहऱ्याचा रंग बदलणे किंवा पापण्यांच्या खाली पिवळे डाग दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.

कॉर्नियामध्ये बदल:

शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे डोळ्यांच्या कॉर्नियामध्ये अनेक बदल दिसून येतात. डोळ्यांच्या कॉर्नियामध्ये हलक्या गडद रंगाची वर्तुळ दिसू लागल्यास दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ला घेऊन उपचार करावे. याशिवाय डोळ्यांमध्ये सुद्धा खराब कोलेस्ट्रॉल जमा होण्यास सुरुवात होते.

शरीरात सतत थकवा जाणवणे:

शरीरात कामाच्या धावपळीमुळे थकवा जाणवू लागतो. यामुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात. शरीरात वारंवार थकवा जाणवत असल्यास दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. शरीरात ऑक्सिजन आणि रक्ताचा प्रवाह योग्यरीत्या होत नसल्यामुळे सतत थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. यामुळे हृदयाच्या आरोग्याला हानी पोहचते.

पोटावर लटकलेली चरबी कमी करण्यासाठी गुणकारी ठरेल हे आयुर्वेदिक चूर्ण, वाढलेले वजन होईल झपाट्याने कमी

शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याची कारणे:

  • जंक फूडचे अतिसेवन
  • शारीरिक हालचालींचा अभाव
  • वाढलेले वजन आणि लठ्ठपणा
  • दारू, सिगारेटचे सेवन

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: These serious symptoms appear on the face after the accumulation of cholesterol in the blood vessels

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2025 | 11:25 AM

Topics:  

  • Bad Cholesterol
  • Cholesterol home Remedy
  • cholesterol symptoms

संबंधित बातम्या

खराब कोलेस्ट्रॉल वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांमुळे जीवन येईल धोक्यात, हृदयाच्या आरोग्याचे होईल गंभीर नुकसान
1

खराब कोलेस्ट्रॉल वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांमुळे जीवन येईल धोक्यात, हृदयाच्या आरोग्याचे होईल गंभीर नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.