पोटावर लटकलेली चरबी कमी करण्यासाठी गुणकारी ठरेल 'ही' पावडर
वाढलेल्या वजनाने जगभरात अनेक लोक त्रस्त आहेत. रोजच्या आहारात तिखट, मसालेदार, गोड इत्यादी पदार्थांचे सेवन केल्यामुळे झपाट्याने वजन वाढू लागते. वजन वाढल्यानंतर शरीराच्या सर्वच अवयवांवर अनावश्यक चरबी वाढू लागते. शरीरावर वाढलेली चरबी आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे शरीराला हानी पोहचते. मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल किंवा आरोग्यासंबंधित अनेक समस्या वाढू लागतात. वजन वाढण्यामागे अनेक कारण आहेत. बऱ्याचदा महिलांसह पुरुष सुद्धा वजन कमी करण्यासाठी एक्सपर्टचे अनेक सल्ले घेतात. तासनतास जिमला जाणे, आहारात केलेले बदल, जीवनशैलीतील बदल इत्यादी अनेक बदल केले जातात. मात्र काहीवेळा हे बदल आरोग्यासाठी अतिशय धोकादायक ठरतात.(फोटो सौजन्य – istock)
वाढलेले वजन कमी करताना कोणत्याही प्रोटीन पावडरचे किंवा पेयांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. किडनी निकामी होऊन शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे वजन कमी करताना आहारात घरगुती पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला पोटावर लटकलेली चरबी कमी करण्यासाठी आयुर्वेदिक चूर्ण बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या चूर्णाचे १५ दिवस नियमित सेवन केल्यास शरीरात अनेक मोठे बदल दिसून येतील. चला तर जाणून घेऊया चूर्ण बनवण्याची सोपी रेसिपी.
वाढलेले वजन कमी करताना आहारात भारतीय मसाल्यांचा वापर करावा. मसाल्यांच्या वापरामुळे शरीराला फायदे होतात. आयुर्वेदिक चूर्ण बनवण्यासाठी सर्वप्रथम, ओवा, बडीशेप, जिरे आणि मेथी दाणे पॅनमध्ये मंद आचेवर भाजून घ्या. सर्व पदार्थ व्यवस्थित भाजून झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घ्या. बारीक तयार केलेली पावडर काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा चूर्ण टाकून मिक्स करून घ्या. तयार केलेले पाणी नियमित सकाळी उपाशी पोटी प्यायल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. या पाण्याच्या सेवनामुळे शरीरात साचून राहिलेली विषारी घाण बाहेर पडून जाईल आणि आतड्यांमधील घाण स्वच्छ होण्यास मदत होईल.
Kidney Failure: किडनी सडल्यानंतर शरीराच्या ‘या’ अवयवांना येते सूज, शरीराचे होईल गंभीर नुकसान
आयुर्वेदिक चूर्णाचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. ओवा शरीरासाठी अतिशय महत्वाचा आहे. ओव्याचे सेवन केल्यामुळे शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाण्यास मदत होईल. ओव्यामध्ये थायमोल नावाचा घटक आढळून येतो, ज्यामुळे शरीरातील टाबॉलिज्म बूस्ट होते आणि पोटावर वाढलेली अनावश्यक चरबी कमी होण्यास मदत होते. बडीशेपचे सेवन केल्यामुळे शरीरात वाढलेले पित्त कमी होण्यास मदत होते. याशिवाय यामध्ये असलेल्या फायबरमुळे पोट कायमच स्वच्छ राहते. जिऱ्याचे सेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते आणि कॅलरी बर्न होण्यास मदत होते. मेथीच्या दाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. रोजच्या आहारात फायबरयुक्त पदार्थांचे नियमित सेवन करावे.