बद्धकोष्ठतेमुळे आतड्यांमध्ये सडलेली घाण स्वच्छ करण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश
बदललेली जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल, अपुरी झोप आणि सतत उद्भवणाऱ्या अपचनाच्या समस्येमुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात. आपल्यातील अनेकांना सतत बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू लागते. बद्धकोष्ठता उद्भवू लागल्यानंतर सतत अपचन, पोट दुखणे, पोट फुगणे किंवा पोटासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक लोक दुर्लक्ष करतात. मात्र असे केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. बद्धकोष्ठता झाल्यानंतर पोटदुखी, उलट्या, मळमळ, गॅस, आम्लता, उष्माघात, मूळव्याध, गुदद्वारासंबंधीचा विच्छेदन, आणि आतड्यांचा कर्करोग इत्यादी अनेक गंभीर आजार होण्याची जास्त शक्यता असते. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतात. यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)
पोटावर लटकलेली चरबी कमी करण्यासाठी गुणकारी ठरेल हे आयुर्वेदिक चूर्ण, वाढलेले वजन होईल झपाट्याने कमी
आहारात सतत तेलकट, मसालेदार किंवा तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात अनेक गंभीर बदल दिसून येतात. यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढणे, याशिवाय अपचनाच्या समस्या वारंवार उद्भवू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीरात निर्माण झालेली बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ होण्यास मदत होते आणि आरोग्य सुधारते.
रोजच्या आहारात सकाळी उठल्यानंतर नियमित सफरचंद खावे. यामध्ये असलेल्या फायबरमुळे शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाते. याशिवाय डॉक्टरसुद्धा नियमित एक सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. यामध्ये असलेल्या पेक्टिनमुळे शरीरात साचलेला घाणरेडा मला मऊ होण्यास मदत होते. तसेच तुम्ही आहारात पपईचे सुद्धा सेवन करू शकता. पपईमध्ये असलेल्या फायबरमुळे पोट आणि आतड्यांमधील घाण स्वच्छ होते आणि आरोग्य सुधारते.
अंजीर खाणे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे. सकाळी उठल्यानंतर नियमित एक अंजीर खाल्यास पोट दीर्घकाळ भरलेले राहील आणि पोटातील घाण स्वच्छ होईल. रात्री झोपण्याआधी वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात अंजीर भिजत घालावे. अंजीर व्यवस्थित भिजल्यानंतर सकाळी उपाशी पोटी सेवन केल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. बद्धकोष्ठता मुळांपासून नष्ट करण्यासाठी अंजीर हे फळ अतिशय प्रभावी आहे. त्यामुळे तुम्ही ओले किंवा सुके असे कोणतेही अंजीर खाऊ शकता.
बद्धकोष्ठतेची समस्या कायमची नष्ट करण्यासाठी केळी खावीत. सकाळी उठल्यानंतर नियमित २ केळी खाल्यामुळे शरीरात साचलेले विषारी घटक बाहेर पडून जातील. तसेच शरीराला अनेक फायदे होतील. केळीमध्ये प्रोबायोटिक फायबर आढळून येतात, ज्यामुळे पोटात चांगले बॅक्टेरिया वाढण्यास मदत होते. नियमित उपाशी पोटी एक किंवा दोन केळी खाल्यास पचनक्रिया निरोगी राहील.