पोटाला सूज आल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' महाभयानक लक्षणे
शरीरासाठी सर्वच अवयव अतिशय महत्वाचे असतात. त्यातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे पोट. खालेले अन्नपदार्थ सहज पचन होण्यासाठी पोट अतिशय महत्वाचे आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दू्षित अन्नपदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. यामुळे पोटात वेदना होणे, गॅस, अपचन किंवा उलट्या होण्याची जास्त शक्यता असते. पोटाला सूज आल्यानंतर बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. पण वारंवार दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी धोक्याचे ठरते. शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे लहान आजार गंभीर स्वरूप घेतात, ज्यामुळे शरीरातील सर्वच अवयवांना इजा पोहचते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पोटाला सूज आल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
वयाच्या आठव्या- नवव्या वर्षी मुलींना मासिक पाळी का येते? जाणून घ्या यामागील सविस्तर कारणे
पोटाला सूज आल्यानंतर पोटाच्या आकारात अनेक बदल होऊ लागतात. गॅस, अपचन किंवा ऍसिडिटी समजून अनेक लोक दुर्लक्ष करतात. असे केल्यामुळे पोटामध्ये जास्तीचा वायू साचून राहतो. तसेच अनेकदा विषारी घटक शरीरात साचून राहण्याची जास्त शक्यता असते. पोटासंबंधित आजारांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.
पोटाला सूज आलेल्या रुग्णांना शौचास त्रास होण्याची जास्त शक्यता असते. अनेक लोक बद्धकोष्ठता किंवा जुलाब समजून दुर्लक्ष करतात. त्यामुळे आरोग्यासंबंधित ही समस्या उद्भवू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. आतड्यांच्या हालचालींमध्ये बदल झाल्यास अजिबात दुर्लक्ष करू नये.
बऱ्याचदा थोडस खाल्ल्यानंतर अनेकांना पोट भरल्यासारखे वाटू लागते. पोटाला सूज आल्यानंतर शरीरात दिसून येणारे प्रमुख लक्षण म्हणजे थोडस खाल्ल्यानंतर लगेच पोट भरल्यासारखे वाटणे. पोटात वारंवार जडपणा जाणवत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे. ओटीपोटात वाढलेल्या वेदनांकडे महिला कधीच लक्ष देत नाही. पण योग्य वेळी उपचार न मिळाल्यामुळे रुग्णाला अस्वस्थ वाटू लागते.
अंघोळ करताना थंड की गरम पाणी वापरावे? जाणून घ्या शरीरासाठी कोणते पाणी आहे जास्त प्रभावी
पोट फुगणे म्हणजे काय?
पोट फुगणे म्हणजे पोटातील गॅस किंवा द्रवपदार्थ साठल्यामुळे पोटात अस्वस्थता किंवा मोठेपणा जाणवणे. हे साधारणतः तात्पुरते आणि निरुपद्रवी असू शकते, पण काहीवेळा ते एखाद्या गंभीर समस्येचे लक्षण असू शकते.
पोट फुगणे कमी करण्यासाठी काय करावे?
कमी गॅस तयार करणारे पदार्थ खा. पुरेसे पाणी प्या. नियमित व्यायाम करा.गरज वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
पोटाला सूज आल्यास काय करावे?
जर सूज जास्त दिवस टिकून राहिली किंवा तीव्र वेदना होत असतील, तर डॉक्टरांना भेटणे आवश्यक आहे.