अंघोळ करताना थंड की गरम पाणी वापरावे? जाणून घ्या शरीरासाठी कोणते पाणी आहे जास्त प्रभावी
शरीर स्वच्छ करण्यासाठी नेहमीच अंघोळ केली जाते. अंघोळ केल्यामुळे शरीरासोबतच मन कायमच प्रसन्न राहण्यास मदत होते. दिवसभर करून शरीरात वाढलेला मानसिक तणाव कमी करण्यासाठी अंघोळ केली जाते. शरीरातील थकवा आणि अशक्तपणा कमी करण्यासाठी अंघोळ करावी. काहींना दिवसभरातून दोन वेळा अंघोळ करण्याची सवय असते. सकाळी आणि रात्रीच्या वेळी अनेक लोक अंघोळ करतात. वर्षाच्या बाराही महिने अनेक लोक थंड पाण्याने तर काही गरम पाण्याची अंघोळ करतात. पण कायमच सगळ्यांचा हाच प्रश्न पडतो की अंघोळ करताना कोणत्या पाण्याचा वापर करावा. थंडीच्या दिवसांमध्ये गरम पाण्याची अंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो. गरम पाणी शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. अंघोळीसाठी थंड किंवा गरम पाण्याचा वापर केल्यामुळे शरीरावर वेगवेगळे परिणाम दिसून येतात.(फोटो सौजन्य – istock)
फुफ्फुस आणि लिव्हरमधील सडलेली घाण 5 दिवसात होईल साफ, सकाळी प्या केवळ घरातील ‘हे’ काळे पाणी
अंघोळीच्या पाण्यात अनेक लोक दूध किंवा मीठ टाकतात. यामुळे शरीरासोबतच मनालासुद्धा अनेक फायदे होतात. अनेक लोक ऋतू आणि शरीराच्या प्रकृतीनुसार अंघोळीसाठी पाणी निवडले जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अंघोळ करताना कोणते पाणी जास्त प्रभावी ठरते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. तुमच्या तब्येतीनुसार पाणी निवडल्यास शरीरासाठी जास्त प्रभावी ठरेल.
नियमित योग्य पद्धतीने अंघोळ केल्यास मानसिक आरोग्य, केसांची निगा आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. तसेच केस गळणे, केसांच्या अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी अंघोळ करताना जास्त गरम पाण्याचा वापर करू नये. आरोग्यासंबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी शरीरास आवश्यक असलेल्या गोष्टी कराव्यात. डॉक्टरांच्या मते, सकाळी उठल्यानंतर थंड पाण्याने आणि रात्री गरम पाण्याची अंघोळ करणे अतिशय प्रभावी ठरेल. तसेच अंघोळीला जाण्याच्या एक तास आधी पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीराचा रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. अंघोळ करताना गरम पाणी डोक्यावर टाकू नये. यामुळे शरीराचे रक्तभिसरण सुधारते.
सकाळी उठल्यानंतर थंड पाण्याची अंघोळ केल्यास झोप लगेच उडून जाते. तसेच मेंदूचे कार्य सुधारते. थंड पाण्यामुळे त्वचेतील सेन्सर्स मेंदूला ॲक्टिव्ह करण्यास मदत करतात. शरीराचा मूड सुधारतो, अलर्टनेस आणि फोकस वाढण्यास मदत होते. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते, थंड पाण्याची अंघोळ करणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. थंड पाण्याची अंघोळ केल्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
थंडीच्या दिवसांमध्ये अनेक लोक गरम पाण्याची अंघोळ करतात. गरम पाण्याची अंघोळ केल्यामुळे शरीरात वेदना कमी होतात. शरीरातील रक्तवाहिन्या हलक्याशा फुलवून स्नायूंना आराम मिळतो. रात्रीच्या वेळी गरम पाण्याची अंघोळ केल्यामुळे चांगली झोप लागते. याशिवाय पॅरासिम्पेथेटिक नर्व्ह सिस्टम ॲक्टिव्ह राहते. शरीरावर वाढलेला मानसिक तणाव कमी होतो.