मेंदूच्या नसांना सूज आल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' भयानक लक्षणे
शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे मेंदू. मेंदू शरीराच्या सर्व क्रियांवर नियंत्रण ठेवण्याचे काम करतो. मात्र बऱ्याचदा मेंदूसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर दुर्लक्ष केले जाते. पण वारंवार शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. मेंदूसंबंधित कोणतीही सामान्य किंवा अतिशय गंभीर समस्या उद्भवल्यास कधीही दुर्लक्ष करू नये. मेंदूच्या नसांना सूज आल्यानंतर शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसू लागतात. याला वैद्यकीय भाषेमध्ये सेरेब्रल एडिमा असे म्हणतात. ही समस्या उद्भवू लागल्यानंतर शरीराला काहींना काही संकेत देण्यास सुरुवात करतो. मेंदूच्या नसांना सूज येण्यामागे अनेक वेगवेगळी कारणे सुद्धा आहेत. मात्र दुर्लक्ष केल्यास रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – iStock)
चुकीची जीवनशैली, शरीरात सतत होणारे बदल, आहारातील बदल, कामाचा वाढलेला तणाव, अपुरी झोप आणि चुकीच्या पद्धतीने झोपल्यामुळे मेंदूच्या नसांना सूज येण्याची शक्यता असते. याशिवाय शरीरात वाढलेला रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉल मेंदूच्या नसांना सूज येण्याचे प्रमुख कारण आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मेंदूच्या नसांना सूज आल्यानंतर शरीरात कोणती गंभीर लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. ही लक्षणे शरीरात दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे.
डोकेदुखीची समस्या सामान्यपणे सगळेच जाणवते. पण बऱ्याचदा काहींना अतिशय तीव्र डोकेदुखी होते. डोकं दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर तोंडातून शब्द उच्चाराने सुद्धा कठीण होऊन जाते. त्यामुळे अचानक जाणवत असलेली तीव्र डोकेदुखी वाढल्यास डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यावा. मेंदूच्या नसांना सूज आल्यामुळे तीव्र डोकेदुखी जाणवते.
मेंदूच्या नसांना सूज आल्यानंतर झोपेची गुणवत्ता पूर्णपणे खराब होऊन जाते. रात्रीच्या वेळी शांत झोप न लागणे, अचानक झोपेतून जाग येणे इत्यादी गंभीर लक्षणे शरीरात दिसून येतात. रात्रीच्या वेळी वारंवार झोप मोड होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषध उपचार करावे.
रात्रीच्या वेळी झोपताना बऱ्याचदा मान आखडून जाते. पण सामान्यपणे अनेक लोक याकडे दुर्लक्ष करतात. पण मेंदूला सूज आल्यानंतर वारंवार मान आखडू लागते. याकडे दुर्लक्ष करू नये. मान आखडण्यास सुरुवात झाल्यानंतर उपचार करावे.
जिभेच्या रंगांवरून ओळखा भयंकर आजाराची लक्षणे! ‘या’ रंगाची जीभ दिसताच डॉक्टरांचा घ्या योग्य सल्ला
मेंदूच्या नसांना आलेली सूज बऱ्याचदा अतिशय जीवघेणी ठरते. कारण यामुळे गोष्ट डबल दिसणे किंवा धुसर दिसण्याचा त्रास होऊ लागतो. अशावेळी डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार केल्यामुळे मेंदूच्या नसांना आलेली सूज कमी होण्यास मदत होईल. तसेच मेंदूच्या नसांना सूज आल्यानंतर अचानक उलट्या होऊ लागतात.