जिभेच्या रंगांवरून ओळखा भयंकर आजाराची लक्षणे!
शरीरात होणाऱ्या बदलांकडे योग्य वेळी लक्ष देणे आवश्यक आहे. आहारात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, चुकीची जीवनशैली, जंक फूडचे सेवन, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. संपूर्ण शरीरातील वेगवेगळे अवयव वेगवेगळी कार्य पार पडतात. मात्र बऱ्याचदा जिभेच्या बदलेल्या रंगाकडे कोणाचेही लक्ष जात नाही. जिभेच्या रंगात होणारे बदल आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. कारण शरीरात होणाऱ्या गंभीर आजारांचा परिणाम जिभेवर लगेच दिसून येतो. त्यामुळे नेहमीच स्वतःच्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. जीभ पांढरी, पिवळी किंवा निळसर दिसायला लागल्यास बरेच लोक दुर्लक्ष करतात. मात्र असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करून आरोग्याची काळजी घ्यावी. (फोटो सौजन्य – iStock)
शरीरात निर्माण झालेली विटामिनची कमतरता, पोषक घटकांचा अभाव, अपुरी झोप, रोगप्रतिकारशक्ती, किडनीचे आजार, हृदयविकार इत्यादी अनेक गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. या बदलांकडे योग्य लक्ष देऊन आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. निळी झालेली जीभ गंभीर आजाराचे संकेत दर्शवते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला जिभेचा रंग कोणत्या आजाराचे संकेत दर्शवतो, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
निरोगी व्यक्तीच्या जिभेचा रंग गुलाबी असतो. जिभेवर असलेले छोटे छोटे पपिली पदार्थाची चव घेणे, बोलणे, चघळणे, अन्नपदार्थ खाणे इत्यादी अनेक गोष्टींसाठी मदत करतात. जिभेचा हलका गुलाबी रंग निरोगी आरोग्याचे संकेत दर्शवतो. मात्र पांढरा, पिवळा, जांभळा किंवा निळसर जिभेच्या रंगांकडे दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी धोक्याचे ठरू शकते. जिभेमध्ये दिसून येणाऱ्या बदलांकडे योग्य लक्ष देऊन आरोग्याची काळजी घ्यावी.
जिभेचा निळा झालेला रंग आरोग्यासाठी अतिशय धोक्याचा आहे. यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. शरीरातील सायनोसिस नावाच्या गंभीर आजाराची लक्षणे शरीरात दिसून येतात. याशिवाय रक्तात ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाल्यानंतर जिभेच्या रंगात सुद्धा अनेक बदल दिसून येतात. शरीरातील हृदय, मेंदू आणि इतर महत्त्वाच्या अवयवयांच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर जिभेचा रंग बदलू लागतो. फुफ्फुसांतील ऑक्सिजनची कमतरता, रक्तवाहिन्यांच्या समस्या किंवा किडनीच्या कार्यात बिघाड झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात.
जिभेचा रंग बदलण्यामागे अनेक कारण आहेत. रक्ताचा विकार, हृदयविकार, फुफ्फुसांचे आजार, किंवा दीर्घकालीन किडनीच्या समस्या इत्यादी अनेक उद्भवू लागल्यास जिभेचा रंग बदलून जाते. याशिवाय शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा न झाल्यामुळे जिभेच्या रंगांमध्ये अनेक बदल दिसून येतात. मात्र योग्य वेळी लक्ष न दिल्यामुळे ही समस्या जिभेपुरतीच नाही तर ओठ आणि बोटांच्या टोकांमध्ये सुद्धा दिसून येते. शरीरात‘ब्लू डिस्कलरेशन सिंड्रोम’ संबंधित समस्या उद्भवू लागल्यास तातडीने डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यावा.