Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिकन लव्हर्ससाठी खास; घरी बनवा स्पाइसी आणि टेस्टी Chicken Shawarma

Weekend Special: यंदाच्या विकेंडला घरी काहीतरी टेस्टी बनवण्याचा विचार करत आहात? मग घरी बनवा स्ट्रीट स्टाइल चिकन शोरमा! मऊ पिटा ब्रेडमध्ये रोल केलेले रोस्टेड चिकन आणि भाज्यांचे मिश्रण आपल्या सर्व क्रेव्हिंग्स भरून काढते.

  • By नुपूर भगत
Updated On: May 11, 2025 | 10:02 AM
चिकन लव्हर्ससाठी खास; घरी बनवा स्पाइसी आणि टेस्टी Chicken Shawarma

चिकन लव्हर्ससाठी खास; घरी बनवा स्पाइसी आणि टेस्टी Chicken Shawarma

Follow Us
Follow Us:

चिकन शोरमा ही एक प्रसिद्ध डिश आहे, जी आता भारतासह अनेक देशांमध्ये आवडीने खाल्ली जाते. हे एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे, जे लहानांपासून मोठ्यांपर्यंतचे आवडीने बनवले आणि खाल्ले जाते. यात चिकनला खास मसाल्यांमध्ये मॅरीनेट करून, एका उभ्या रोटिसेरीवर भाजून घेतले जाते आणि नंतर ते विविध भाज्या, सॉस आणि पिटा ब्रेडमध्ये रोलमध्ये रोल करून सर्व्ह केले जाते.

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा कुरकुरीत कोबीचे कटलेट, दिवसाची सुरुवात होईल आनंदायी आणि फ्रेश

तुम्ही बाजारामध्ये शोरमाचे अनेक स्टॉल्स पाहिले असतील. नॉनव्हेज लव्हर्ससाठी हे एक आवडीचे स्नॅक्स आहे. अशात आज आम्ही तुम्हाला हाच चिकन शोरमा घरी कसा तयार करायचा याची एक सोपी रेसिपी सांगणार आहोत. चिकन शोरमा घरी तयार करणे फार सोपे आहे, शिवाय यामुळे तुमचे बरेच पैसेही वाचू शकतात आणि तुम्ही घरीच फ्रेश शोरमा बनवून कुटुंबाला खाऊ घालू शकता. चला तर मग यासाठी लागणारे साहित्य आणि कृती नोट करून घेऊयात.

साहित्य

  • बोनलेस चिकन – ५०० ग्रॅम (ज्युलिएन कापलेले)
  • दही – १/२ कप
  • आलं-लसूण पेस्ट – १ टेबलस्पून
  • लाल तिखट – १ टेबलस्पून
  • गरम मसाला – १/२ टीस्पून
  • हळद – १/२ टीस्पून
  • लिंबाचा रस – १ टेबलस्पून
  • जिरे पूड – १/२ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – १ टेबलस्पून
  • मेयोनेज़ – १/२ कप
  • लसूण पेस्ट – १ टीस्पून
  • लिंबाचा रस – १ टीस्पून
  • थोडं मीठ
  • पिटा ब्रेड / पराठा / बन – ४
  • कांदा – बारीक कापलेला
  • टोमॅटो – बारीक चिरलेला
  • कोशिंबीर / काकडी – चिरलेली (ऑप्शनल)
Alu Vadi Recipe: महाराष्ट्रीयन स्टाईल पारंपरिक अळूवडी रेसिपी; जेवणाची चव होईल द्विगुणित

कृती

  • चिकन शोरमा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात चिकन वरील सर्व साहित्य (मॅरिनेशनसाठी) एकत्र करून किमान १ तास मॅरिनेट करून ठेवा
  • तुम्ही चिकन ३-४ तास देखील मॅरीनेट करू शकता, मॅरिनेशनमुळे चिकनमध्ये सर्व साहित्य चांगले शोषून घेतले जातात आणि याने चव आणखीन वाढते
  • चिकन मॅरीनेट करून झाले की मग एका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून त्यात मॅरिनेट केलेलं चिकन टाका आणि मध्यम आचेवर १०-१५ मिनिटं शिजवा
  • यानंतर एका छोट्या बाऊलमध्ये मेयोनेज़, लसूण पेस्ट, लिंबाचा रस आणि थोडं मीठ एकत्र करून मिक्स करा
  • पिटा ब्रेडवर किंवा पराठ्यावर तयार सॉस लावा, मग त्यावर शिजलेलं चिकन, कांदा, टोमॅटो आणि कोशिंबीर ठेवा
  • सर्व साहित्य व्यवस्थित रोल करा आणि तुमचा चिकन शोरमा खाण्यासाठी सर्व्ह करा
  • तुमचा हा शोरमा मेयो गार्लिक सॉस अथवा तुमच्या आवडीच्या चटणीसह खाण्यासाठी सर्व्ह करू शकता

Web Title: These weekend make spicy and tasty chicken shawarma at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2025 | 10:02 AM

Topics:  

  • best recipe
  • food recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ
1

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश
2

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश

Tawa Pulao Recipe: सिक्रेट मसाल्याचा वापर करून घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव, सगळेच खातील आवडीने
3

Tawa Pulao Recipe: सिक्रेट मसाल्याचा वापर करून घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव, सगळेच खातील आवडीने

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा
4

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.