
Boondi Ladoo Recipe (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
पीठ कसं असावं हे खूप महत्वाचं आहे. जास्त घट्ट असेल तर बुंदीला शेपटी येते. आणि जास्त पातळ असेल तर बुंदी चपटी होते. त्यामुळे पीठ मध्यम ठेवा. पीठ तयार झालं की शेवटी त्यात पाव चमचा खायचा सोडा टाका आणि हलकं हलवा.आता कढईत तेल गरम करायला ठेवा. तेल चांगलं तापलं की हातात चाळणी घ्या. चाळणीवर थोडं पीठ टाका आणि ते हळूहळू गरम तेलात सोडा. पीठ चाळणीतून थेंब थेंब पडलं पाहिजे, तरच गोल गोल बुंदी तयार होते.
एकाच वेळी खूप बुंदी टाकू नका. नाहीतर त्या एकमेकांना चिकटतात. बुंदी कुरकुरीत झाली की ती बाहेर काढा आणि किचन पेपरवर ठेवा म्हणजे जास्तीचं तेल निघून जाईल.
एका पातेल्यात दीड कप साखर आणि एक कप पाणी टाका. हे 2 मिनिटं उकळू द्या. पाक चिकट करायचा नाही, तो पातळच ठेवायचा आहे. पाक झाला की गॅस बंद करा.आता या गरम पाकात केशरी रंग, एक चमचा लिंबाचा रस आणि अर्धा चमचा वेलची पूड टाका. लिंबाचा रस टाकल्यामुळे पाकात गोळे होत नाहीत, हे लक्षात ठेवा.
आता लाडू वळायची वेळतयार पाकात तळलेली बुंदी, कापलेले पिस्ते आणि काजू टाका. सगळं नीट मिक्स करा. पाक प्रत्येक बुंदीला लागला पाहिजे.
मिश्रण थोडं कोमट झालं की लाडू वळायला घ्या. जास्त गरम असेल तर हात भाजेल आणि जास्त थंड झालं तर लाडू वळले जाणार नाहीत. त्यामुळे कोमट असतानाच हळुवारपणे लाडू वळा.
हे लाडू फ्रिजमध्ये ठेवले तर 7 दिवस आरामात टिकतात. दिवाळीत पाहुणे आले की पटकन बाहेर काढायचे आणि द्यायचे.या दिवाळीत एकदा तरी हे लाडू घरी बनवून बघा. घरच्यांना खूप आवडतील.
Ans: बेसन, साखर, पाणी, तेल, वेलची पूड, केशरी रंग आणि सुकामेवा लागतो.
Ans: पीठ मध्यम घट्ट असावे. जास्त घट्ट किंवा पातळ नसावे.
Ans: चाळणीतून पीठ हळूहळू गरम तेलात सोडावे.