श्वास थांबला की आयुष्य थांबेल! तुमच्या फुप्फुसांना द्या जीवनदान... 'हे' पेय Lungs ला चिकटलेली सर्व घाण करेल दूर
आपले शरीर श्वासांवर जगते. श्वास थांबले तर शरीर कार्य करणे थांबते. आपल्या शरीराचा एक-एक श्वास जगण्यासाठी फार महत्त्वाचा असतो. पण आपल्या दैनंदिन जीवनातील काही सवयी श्वसनक्रियेसारखे महत्त्वाचे कार्य करणाऱ्या फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी करतो. या सवयी वेळीच टाळणे आवश्यक असते अन्यथा फुफ्फुसांचा कर्करोग असा जीवघेणा आजार होण्याचे दाट शक्यता असते.
ही 6 लक्षणे दिसून येताच समजून जा… तुमची किडनी झालीये खराब; निष्काळजीपणा हिरावून घेईल आयुष्य
या फुफ्फुसांना निरोगी ठेवणे आपल्या जगण्यासाठी फार महत्त्वाचे असते. मुळात, फुफ्फुसे बाहेरील ऑक्सिजन शरीरात घेऊन शरीरात असणारा कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर फेकण्याचे काम करते. त्यामुळे असे म्हणतात की जर आपले फुफ्फुसे निरोगी असतील तरच आपल्या आयुष्य निरोगी असेल. पण सध्याच्या जगात प्रदूषण असो किंवा धूम्रपानाचे सेवन सगळे काही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सकाळी ऊन पडतो तर रात्री पाऊस तर मध्यरात्री थंडी असे काही हवामानात बदल सुरू आहेत, ज्याचा थेट परिणाम फुफ्फुसांच्या आरोग्यावर होतोय, तर कधीकाळी आपला जीवनशैलीमध्ये घडणारे बदल या सर्व आघातांना कारणीभूत ठरतात.
या फुफ्फुसांना अधिक सक्षम बनवण्यासाठी तसेच निरोगी ठेवण्यासाठी धूम्रपान टाळणे, वाढत्या प्रदूषणामध्ये मास्क वापरणे, दररोज प्राणायाम सारखे योगा करणे, मुबलक प्रमाणात पाणी पिणे तसेच सकस आहार घेणे, तसेच नियमित ताजी हवा खाणे आवश्यक आहे. पण तरीही फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी काही कमतरता जाणवत असेल तर घरच्या घरी तुम्ही काही पेय तयार करू शकता ज्यांचे सेवन करून फुफ्फुसे निरोगी ठेवता येतात.
ग्रीन टी
ग्रीन टी मध्ये अँटिऑक्सिडंट आणि अतिशय कमी प्रमाणात कॅफिन असते. याचे सेवन केल्यास फुफ्फुसांमध्ये झालेली सूज कमी होते आणि रक्त शुद्ध होऊन पचन संस्था मजबूत होते.
आलं, मध व लिंबूचा चहा
आलं म्हणजे जंतुनाशक! मध घशातील खवखव व कोरडेपणा दूर करणारे खाद्यपदार्थ! तर लिंबू म्हणजे व्हिटॅमिन C ने भरपूर असलेले स्त्रोत! या तिघांचे संगम जर आपल्या सेवनात असेल तर आपल्या फुफ्फुसांच्या आरोग्याला कोणतीही बाधा नसेल आणि आपले फुप्फुसे सदा निरोगी राहतील.
हळद व आलं यांचा काढा
हळदीतील करक्यूमिन आणि आल्यातील जिंजरॉल हे नैसर्गिक सूज नियंत्रक घटक आहेत. या काढ्यामुळे फुफ्फुसांना संसर्गापासून संरक्षण मिळते आणि सर्दी-फ्लूपासून दिलासा मिळतो.
ज्येष्ठमध चहा
ज्येष्ठमधामध्ये अँटीव्हायरल आणि अँटीमायक्रोबियल गुणधर्म असतात. हा चहा कफ सैल करून बाहेर टाकतो, त्यामुळे दमा, खोकला आणि सर्दी यासाठी तो उपयुक्त ठरतो.
आहारात चुकूनही करू नका ‘या’ भाज्यांचे सेवन! मूळव्याधीचा होईल गंभीर आजार, ओढावेल ऑपरेशनची वेळ
फुफ्फुसांचे डिटॉक्सिफिकेशन म्हणजे काय?
फुफ्फुसांचे डिटॉक्सिफिकेशन म्हणजे प्रदूषक आणि त्रासदायक घटकांसारख्या हानिकारक पदार्थांपासून फुफ्फुसांना स्वच्छ करण्याची प्रक्रिया.
फुफ्फुसांना डिटॉक्सिफाय करण्याचे काही नैसर्गिक मार्ग कोणते?
धूम्रपान टाळणे, भरपूर पाण्याचे सेवन करा आणि वायू प्रदूषणाचा संपर्क कमीत कमी करा
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.