Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अ‍ॅसिडिटीमुळे पोटात वाढलेले पित्त कमी करण्यासाठी प्रभावी ठरेल ‘हा’ पदार्थ, आयुर्वेदिक घरगुती उपाय करून मिळेल आराम

शरीरात वाढलेले पित्त कमी करण्यासाठी रोजच्या आहारात तुपाचे सेवन करावे. यामुळे अन्नपदार्थ सहज पचन होण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया तुपाचे सेवन करण्याचे फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 08, 2025 | 08:33 AM
अ‍ॅसिडिटीमुळे पोटात वाढलेले पित्त कमी करण्यासाठी प्रभावी ठरेल 'हा' पदार्थ

अ‍ॅसिडिटीमुळे पोटात वाढलेले पित्त कमी करण्यासाठी प्रभावी ठरेल 'हा' पदार्थ

Follow Us
Close
Follow Us:

दैनंदिन आहारात बऱ्याचदा चुकीच्या आणि अतितिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. शरीरात पित्त वाढणे, अ‍ॅसिडिटी, अपचन, मळमळ , उलट्या होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. आहारात सतत जंक फूडचे सेवन केल्यामुळे शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीवर गंभीर परिणाम दिसून येतो. यामुळे पोट आणि आतड्यांसंबंधित समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे रोजच्या आहारात शरीरास पचन होणाऱ्या हलक्या आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. शरीरात पित्त वाढल्यानंतर मळमळ, त्वचेवर पुरळ उठणं, डोकेदुखी, चिडचिड आणि जळजळ, उलट्या इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे आहारात कोणत्याही पदार्थांचे सेवन करून नये. (फोटो सौजन्य – iStock)

5 रुपयांचा हा पदार्थ ठरेल सर्व आजारांवर रामबाण उपाय; सर्दी-खोकलाच काय तर डोकेदुखीही होईल दूर

बऱ्याचदा शरीरात तिन्ही दोष एकत्र झाल्यामुळे शारीरिक स्थिती असंतुलित होऊन जाते. त्यामुळे शरीराला अनेक विकार होऊ लागतात. शरीरात पित्ताची वाढ झाल्यानंतर अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषध घेतात, मात्र या गोळ्या औषधांचे वारंवार सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेले पित्त कमी करण्यासाठी कोणत्या आयुर्वेदिक मसाल्यांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या मसाल्यांच्या सेवनामुळे शरीराला तात्काळ आराम मिळेल.

रिकाम्या पोटी तुपाचे सेवन करावे:

सकाळी उठल्यानंतर नियमित उपाशी पोटी एक चमचा तूप खावे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. तुपाचे सेवन केल्यामुळे अन्नपदार्थ सहज पचन होण्यास मदत होते. याशिवाय यामध्ये असलेल्या घटकांमुळे आरोग्य सुधारते. याशिवाय तुम्ही एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा तूप मिक्स करून प्यायल्यास शरीराची पचनक्रिया कायमच निरोगी राहील. सकाळी उठल्यानंतर तूप खाल्यास संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जाईल. तसेच जळजळ, असिडिटीची समस्या उद्भवणार नाही.

चपातीसोबत तुपाचे सेवन:

काहींना सकाळी उठल्यानंतर नाश्त्यामध्ये चपाती खाण्याची सवय असते. त्यामुळे नुसतीच चपाती न खाता चपातीसोबत तूप खावे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतील. साजूक तूप स्नायूंमधील स्निग्धता वाढवण्यासाठी मदत करते. याशिवाय खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन होण्यास मदत होते. अनेक लोक तूप खाणे टाळतात, पण वारंवार गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी तुपाचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.

Corona: वाढत्या करोनादरम्यान 5 मसाल्यांचे सेवन ठरेल रामबाण, Immunity होईल बुस्ट आजार होईल छुमंतर

तूप खाण्याची योग्य वेळ:

दैनंदिन आहारात कोणताही पदार्थ वेळी अवेळी खाल्ला जातो. यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडून जाते. पचनक्रिया बिघडल्यानंतर शरीरात पित्त तयार होऊ लागते. शरीरात वाढलेल्या पित्तामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू नये म्हणून आहारात तुपाचे सेवन करावे. तुपाचे सेवन सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी करावे, यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. तसेच नियमित योग्य वेळी, मोजून तूप खाल्यास शरीराची पचनक्रिया कायमच निरोगी राहते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: This substance will be effective in reducing the pitta increased in the stomach due to acidity ghee benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2025 | 08:33 AM

Topics:  

  • acidity
  • Benefits of Ghee
  • home remedies

संबंधित बातम्या

Hair Care Tips: आठवड्यातून किती वेळा केस धुवणे योग्य? रोज केस धुतल्यामुळे उद्भवतात केसांसंबधित ‘या’ गंभीर समस्या
1

Hair Care Tips: आठवड्यातून किती वेळा केस धुवणे योग्य? रोज केस धुतल्यामुळे उद्भवतात केसांसंबधित ‘या’ गंभीर समस्या

Skin Care Tips: काळे डाग आणि पिंपल्समुळे त्वचेवरील सौंदर्य कमी झाले आहे? रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा जायफळ क्रीम
2

Skin Care Tips: काळे डाग आणि पिंपल्समुळे त्वचेवरील सौंदर्य कमी झाले आहे? रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा जायफळ क्रीम

चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या महिनाभरात होतील कमी! रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा लवंगाची एंटी-एजिंग नाईट क्रीम
3

चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या महिनाभरात होतील कमी! रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा लवंगाची एंटी-एजिंग नाईट क्रीम

केस खूप जास्त कोरडे आणि पातळ झाले आहेत? वाढत्या उन्हाळ्यात घरीच तयार करा नॅचरल हेअर मास्क, केसांची होईल वाढ
4

केस खूप जास्त कोरडे आणि पातळ झाले आहेत? वाढत्या उन्हाळ्यात घरीच तयार करा नॅचरल हेअर मास्क, केसांची होईल वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.