
कॅन्सरच्या जीवघेण्या गाठी नष्ट करून टाकण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश
कॅन्सरच्या पेशी कशामुळे वाढतात?
कॅन्सरच्या पेशी नष्ट करणारे पदार्थ?
कॅन्सरची लक्षणे?
कॅन्सरसारख्या जीवघेण्या आणि अतिशय गंभीर आजाराचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालील जमीन सरकते. कॅन्सर झाल्यानंतर शारीरिक आणि मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. त्यामुळे चुकीच्या जीवनशैली न जगता पोषक आहार आणि नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. शरीरातील पेशींची अनियंत्रित आणि अस्वाभाविक वाढ झाल्यानंतर निरोगी पेशी पूर्णपणे नष्ट होऊन जातात. ज्यामुळे शरीराच्या कोणत्याही अवयवावर गाठ येणे, जखमा लवकर न भरणे इत्यादी बरीच लक्षणे दिसू लागतात. शरीरातील ‘फ्री रॅडिकल्स’ नष्ट झाल्यानंतर पेशींच्या डीएनेला हानी पोहचते. त्यामुळे कॅन्सरच्या पेशी वाढू नये म्हणून आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात.(फोटो सौजन्य – istock)
वृद्धांसाठी करा सहलीचे नियोजन! सहलीला जाण्याआधी ‘या’ गोष्टींची घ्या योग्य काळजी, जाणून घ्या सविस्तर
प्रत्येक स्वयंपाक घरात हळद आणि लसूण उपलब्ध असते . हळदीचा वापर जेवणाचा रंग आणि चव वाढवण्यासाठी केला जातो तर लसुणचा वापर फोडणी देण्यासाठी केला जातो. यामुळे पदार्थाची चव वाढते. याशिवाय शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित दोन लसूण पाकळ्या कच्च्या चावून खाल्ल्यास कॅन्सरच्या अनियंत्रित पेशी वाढणार नाहीत. लसणामध्ये ‘एलिसिन’ नावाचा घटक आढळून येतो. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातो. शरीरातील विषारी घटक बाहेर पडून गेल्यास पोट आणि आतड्यांचा कॅन्सर होण्याची शक्यता कमी होऊन जाते.
दैनंदिन आहारात क्रुसिफेरस भाज्यांचे सेवन करावे. या भाज्यांच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. फ्लॉवर, ब्रोकोली आणि कोबी इत्यादी भाज्यांचे सेवन केल्यास शरीराला भरपूर फायदे होतील.क्रुसिफेरस भाज्या शरीरातील पेशींचे नुकसान होऊ देत नाहीत. याशिवाय भाज्यांमध्ये आढळून येणारे ‘सल्फोराफेन’ ट्युमरच्या गाठींपासून शरीराचे रक्षण करते. शरीरात ट्युमरच्या पेशी वाढू नये म्हणून आहारात कायमच पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे.
पुरुषांनो, चाळीशीतही फिट राहायचंय? मग मजबूतपणा टिकवून ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
आंबट गोड टोमॅटो खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. टोमॅटोच्या सेवनामुळे शरीराला खूप फायदे होतात. यामध्ये ‘लायकोपीन’ नावाचे एक शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट आढळून येते. पुरुषांमध्ये वाढलेल्या प्रोस्टेट कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी टोमॅटोचे सेवन करावे. लायकोपीनमुळे पेशींमधील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो आणि कॅन्सरच्या पेशी झपाट्याने वाढू लागतात. त्यामुळे आहारात टोमॅटोपासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे.
Ans: कर्करोग म्हणजे शरीरातील पेशींची अनियंत्रित आणि असामान्य वाढ, ज्यामुळे शरीराच्या सामान्य कार्यामध्ये अडथळा येतो.
Ans: धूम्रपान, मद्यपान, असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव.
Ans: अचानक वजन कमी होणे.सतत खोकला किंवा घशात बदल.