(फोटो सौजन्य – istock)
घरातील वडिलधाऱ्यांचे मार्गदर्शन लहान मुलांसाठी महत्त्वाचे, संकटाच्या वेळेत होईल फायदा
आजच्या धावपळीच्या जगात तसेच खराब लाईफस्टाइलमुळे अनेक पुरुष आजारांना बळी पडत आहेत. यामुळे पुरुषांना निरनिराळी औषधे घ्यावी लागत आहेत. पण त्याने फायदा मिळण्यापेक्षा नुकसान होत आहे. पुरूषांच्या तब्येतीवर झालेल्या परिणामाचा त्यांच्या लैंगिक जीवनावरही प्रभाव पडत आहे. अशा परिस्थितीत, काही करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. तुम्ही काही घरगुती उपाय करून चाळीशीत तंदुरूस्त राहायचा विचार नक्की करू शकता.
खजूर
कॅल्शियम, फायबर, झिंक मैग्नेशिअम आणि आयर्नने परिपूर्ण असणारे खजूर खाऊन पुरूष त्यांचा स्टॅमिना वाढवू शकतात. शारीरिकदृष्ट्या दुर्बल आणि बारीक लोकांसाठी खजूर खाणे फायदेशीर आहे. याशिवाय रोज सुका खजूर खाल्ल्याने तुमची पचनशक्ती चांगली राहते. तुम्ही दुधात खजूर घालून प्यायल्यास त्याचे आणखी चांगले परीणाम दिसतील.
मखाणा
मखाणा पुरुषांसाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती असून त्यातील कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, मिनरल्स, फॅट्स, फॉस्फरस हे घटक तुम्हाला निरोगी ठेवतात.
अळशीच्या बिया
अळशीच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिडचे प्रमाण सर्वाधिक असते ज्यामुळे याचे सेवन मेंदू आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरते. यामधील फायबर पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठीही मदत करते.
डाळी आणि कडधान्ये
डाळी आणि कडधान्ये हे प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा उत्तम स्रोत आहेत. यामुळे पचनक्रिया सुधारते, रक्तातील हिमोग्लोबिन वाढते आणि हाडं मजबूत होण्यास मदत होते.
लसूण
लसणाचे सेवन विशेषतः पुरुषांसाठी अत्यंत फायद्याचे ठरते. हा नैसर्गिकरित्या टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवणारा घटक आहे. यामुळे शारीरिक ताकद वाढते, रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






