फक्त २ साहित्यापासून घरी तयार करा नॅचरल Eye Mask; रातोरात डोळ्यांवरील काळी वर्तुळे होतील दूर
सध्याचं युग हे धावपळीचं युग आहे. व्यस्त जीवनशैली आणि खाण्या-पिण्यातील चुका आरोग्यासहच त्वचेच्याही अनेक समस्यांना खुले आमंत्रण देत असते. अनेकदा कामाच्या व्यापामुळे आपण उशिरा जेवतो आणि मग उशिराने झोपतो आणि यामुळेच आपल्या त्वचेवर परिणाम होऊ लागतो. आजकाल अनेकांना मध्यरात्रीपर्यंत जागं राहण्याची सवय आहे, यामुळे आपल्या डोळ्यांवर काळी वर्तुळे दिसू लागतात ज्यामुळे आपला संपूर्ण चेहरा खराब होती आणि डल वाटू लागतो. अनेकदा मेकअप करूनही ही काळी वर्तुळे लपली जात नाहीत आणि यावर वेळीच काही उपाय केला नाही तर ही वर्तुळे आणखीन गडद होऊ लागतात.
बाजारात प्रत्येक समस्येवर उपाय उपलब्ध आहेत आणि त्यासाठी नवनवीन क्रीम्स आणि प्रोडक्टस देखील उपलब्ध आहेत मात्र आज आम्ही तुम्हाला डोळ्यावरील काळी वर्तुळे दूर करण्यासाठीचा एक साधा, सोपा आणि घरगुती उपाय सांगणार आहोत. हा उपाय सहज घरीच तयार केला जातो आणि काही दिवसांत त्याचा प्रभावही दिसून येतो. हा उपाय पुरुष, महिला दोघही वापरू शकतात. यासाठी आपल्याला फक्त कॉफी आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूलची मदत घ्यावि लागणार आहे. दरम्यान आपण आपल्या जीवनशैलीत जर ८ तासांची झोप घेतली नाही वेळेवर झोपलो नाहीत तर ही समस्या जाणवू लागते.
घरगुती आय मास्कसाठी लागणारं शाहीतून
ही रेसिपी बनवण्यासाठी, तुम्हाला वर दिलेल्या दोन साहित्यांची आवश्यकता आहे. यासाठी तुम्ही एका भांड्यात कॉफी आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिक्स करू शकता. आता या दोन्ही गोष्टींची जाड पेस्ट बनवा. यामुळे, हा आय मास्क काही काळ डोळ्यांखाली राहील. पेस्ट डोळ्याखाली लावली की १० मिनिटे तशीच राहू द्या आणि ही पेस्ट सुकली की मग चेहरा पाण्याने धुवून काढा. नियमितपणे हा उपाय केल्यास तुम्हाला नक्कीच बदल झालेले दिसून येतील.
मास्कचे फायदे
कॉफीमध्ये असलेले कॅफिन डोळ्यांखालील त्वचेत रक्ताभिसरण वाढवून काळी वर्तुळे कमी करण्यास मदत करते . कॅफिन रक्तवाहिन्या आकुंचन पावते, ज्यामुळे सूज आणि काळी वर्तुळांची समस्या कमी होते. याचबरोबर व्हिटॅमिन ई कॅप्सूल काळी वर्तुळे कमी करण्यास मदत करतात. ते त्वचेला पोषण देते आणि जळजळ कमी करण्यास मदत करते. व्हिटॅमिन ई हे एक अँटिऑक्सिडंट आहे, जे त्वचेला मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करते आणि मेलेनिनचे उत्पादन कमी करून काळी वर्तुळे हलके करण्यास मदत करते.
काळी वर्तुळे टाळण्यासाठी किती झोप घ्यायला हवी?
दररोज रात्री सात ते आठ तासांची झोप
काळ्या वर्तुळांसाठी कोणते घटक चांगले आहेत?
व्हिटॅमिन के, कॅफिन, हायल्यूरोनिक अॅसिड, नियासीनामाइड, व्हिटॅमिन सी
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.