चेहऱ्यावरील ओपन पॉर्स होतील कायमचे गायब! त्वचेसाठी पांढऱ्या फुलांचा 'या' पद्धतीने करा वापर
सर्वच महिलांना त्वचेसंबंधित सतत काहींना काही समस्या उद्भवू लागतात. पिंपल्स, ऍक्ने, ओपन पॉर्स, मुरूम इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर महिला सतत काहींना काही उपाय करत असतात. कधी फेशिअल करून त्वचेवरील चमक वाढवली जाते तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन ब्राइटनिंग क्रीम लावल्या जातात. सर्वच महिलांमध्ये प्रामुख्याने दिसून येणारी समस्या म्हणजे ओपन पॉर्स. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेच्या ओपन पॉर्समध्ये धूळ, माती, प्रदूषणामुळे घाण जाणून बसते. तसेच यामुळे त्वचा तेलकट आणि चिकट होऊन जाते. त्वचा तेलकट किंवा चिकट झाल्यानंतर योग्य वेळी स्वच्छ न केल्यामुळे चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स येतात. पिंपल्स आल्यानंतर ते फोडण्यासाठी महिला वेगवेगळ्या पिन्सचा वापर करतात. मात्र यामुळे पिंपल्स कमी होण्याऐवजी आणखीनच वाढण्याची जास्त शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)
त्वचेच्या छिद्रांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या प्रॉडक्टचा वापर न करता घरगुती उपाय करून ओपन पॉर्स स्वच्छ करावे. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर वाढलेले ओपन पॉर्स कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे घरगुती उपाय केल्यामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाते आणि चेहरा उजळदार दिसू लागतो. घरगुती उपाय केल्यामुळे त्वचा आतून स्वच्छ होण्यास मदत होते. याशिवाय त्वचेची छिद्र बंद होतात.
त्वचेच्या छिद्रांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी गरम पाणी करून घ्या. गरम केलेल्या पाण्यात ४ ते ५ जास्मिनची फुले आणि तुरटीचा छोटा खडा घालून पाणी गरम करून घ्या. पाणी व्यवस्थित गरम केल्यानंतर सगळ्यात शेवटी त्यात चमचाभर ग्लिसरीन घालून मिक्स करा. त्यानंतर तयार केलेले पाणी थंड करा. पाणी थंड झाल्यानंतर बर्फाच्या ट्रेमध्ये पाणी ओतून घ्या. त्यानंतर फ्रिजमध्ये बर्फ सेट होण्यासाठी ठेवा.
पावसाळ्यात अंघोळ केल्यानंतर चेहऱ्यावर लावा ‘या’ गोष्टी, दिवसभर राहाल कायमच फ्रेश आणि आनंदी
तयार केलेले बर्फाचे खड्डे नियमित सकाळी चेहऱ्यावर मसाज केल्यास त्वचेच्या छिद्रांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ होईल आणि चेहरा चमकदार दिसू लागेल. ओपन पॉर्समध्ये साचलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी कोणत्याही क्रीम किंवा आर्टिफिशियल उपाय करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी.