(फोटो सौजन्य: istock)
बदलत्या काळात अनेकांना आरोग्याच्या समस्यांसहच त्वचेच्या समस्यांनाही सामोरं जावं लागत आहे. अशात आजकाल प्रत्येकजणच आपकता त्वचेची फार काळजी घेऊ लागलं आहे. यासोबतच अनेकांना कॉलेजनची माहिती झाली आहे. कोलेजन आपल्या त्वेचेसाठी चांगलं मानलं जात अशात जर तुम्हालाही प्रश्न पडला असेल की हे नक्की काय आहे तर चला आज याविषयीची एक सविस्तर माहिती या लेखात जाणून घेऊया. कोलेजन आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामुळेच अनेकजण शरीरात कोलेजनचे प्रमाण वाढवण्यासाठी सप्लिमेंट्स घेऊ शकतात.
सध्याच्या जगात प्रत्येकजण कोणतीही आरोग्याची समस्या सोडवायची असली की शॉर्टकट शोधात विविध औषधांचा आधार घेतात. मात्र खराब जीवनशैली आणि बिघडलेल्या आहारामुळे लोकांच्या शरीरात पोषक तत्वांचा अभाव असतो. ही कमतरता पूर्ण करण्यासाठी ते औषधांची मदत घेण्याऐवजी आपण काही घरगुती पण औषधी अशा पदार्थांचे सेवन करू शकता. कोलेजनची कमतरता भरून काढण्यासाठी अनेकजण सप्लिमेंट्सची मदत घेतात मात्र आज आम्ही तुम्हाला घरातील असा एक पदार्थ सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही घरीच तुमच्या शरीरातील कोलेजनचे प्रमाण वाढवू शकता.
नैसर्गिकरित्या कोलेजन कसे वाढवायचे?
आम्ही तुम्हाला सांगतो की, शरीरातील कोलेजन नैसर्गिकरित्या वाढवता येते. यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात फक्त गोंद कटीराचा समावेश करावा लागेल. गोंद कटीरा बाजारात कुठेही उपलब्ध असून बऱ्याचदा आपल्या स्वयंपाकघरात हा पदार्थ पडलेला असतो. याचे सेवन आरोग्यासह त्वचेसाठीही फायद्याचे ठरते. चला आता कॉलेजन नक्की काय आहे आणि गोंद कटीराची यात कशी आणि काय मदत होते ते जाणून घेऊया.
कोलेजन काय असतं?
कोलेजन (Collagen) एक प्रथिन आहे, जे आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या आढळते. हे त्वचा, हाडे, स्नायू, आणि इतर संयोजी ऊती (connective tissues) यांचा महत्वाचा भाग आहे. कोलेजन आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे कारण ते या ऊतींना आधार आणि शक्ती देते.
कोलेजनचे फायदे काय?
कसे सेवन करावे?
शरीरात कोलेजनचे प्रमाण वाढवण्याची तुम्ही याचा एक मॉर्निंग ड्रिंक बनवून त्याचा आहारात समावेश करू शकता. चला हा मॉर्निंग ड्रिंक घरी कसा तयार करायचा ते जाणून घेऊया.
साहित्य
ड्रिंक बनवण्याची पद्धत
कोलेजन काय आहे?
कोलेजन हे एक प्रथिन आहे जे संयोजी ऊतींसाठी एक बिल्डिंग ब्लॉक म्हणून काम करते, शरीराच्या विविध भागांना रचना आणि आधार प्रदान करते.
कोलेजनचे कार्य काय आहे?
कोलेजन शरीराला आकार आणि मजबुती देते. त्वचेला लवचिकता (flexibility) प्रदान करते. तसेच, हाडे आणि स्नायू मजबूत करते. सांध्यांचे कार्य सुरळीत ठेवते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.