हृदय निरोगी ठेवण्यासाठी आजपासून करा 'या' पदार्थांचे सेवन; कोलेस्टेरॉल नष्ट करून हृदयविकाराचा धोकाही टळेल
हृदय आपल्या संपूर्ण शरीरासाठी एक महत्वाची कामगिरी बजावत असतो. पण हेच हृदय जेव्हा आजाराने त्रस्त होते तेव्हा आपले आयुष्य जीवन मरणाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचते. त्यामुळे या हृदयाच्या आरोग्याला जपणे फार गरजेचे असते. स्वतःचे हृदय जपणे म्हणजेच स्वतःला जपणे. जर तुम्ही हृदयविकारापासून त्रस्त आहात तर काही तज्ञ मंडळींनी सुचवलेले खाद्यपदार्थ तुमच्या आयुष्याला नवे वळण देऊ शकते. काय आहेत ते खाद्यपदार्थ? कोणते आहेत ते खाद्यपदार्थ? चला तर मग या लेखातून जाणून घेऊयात.
हिरव्या भाज्या
हृदयविकारापासून त्रस्त असलेल्या रुग्णांनी हिरव्या भाजीचे सेवन नियमित करा. हिरव्या भाज्या खाण्यास आवडत नसतील तरीही स्वतःच्या आयुष्यासाठी या भाज्या खाण्यास सुरुवात करा. तुमच्या सेवनात पालक, मेथी तसेच नायट्रेट ने भरपूर हिरव्या भाज्यांचा समावेश करा जेणेकरून वाढते ब्लड प्रेशर यंत्रणात येईल आणि रक्तवाहिन्या मजबूत होतील.
ओट्स
हृदयविकार असेल तर आजपासूनच ओट्स खा. यामध्ये जास्त प्रमाणात फायबर असते. यातील LDL घटक रक्तवाहिन्यांना स्वच्छ करण्यास मदत करते. शरीरात रक्त चांगल्या प्रमाणात पोहोचते.
फळं
फळ हृदयाच्या आरोग्यासाठी अति उत्तम आहेत. दररोज नियमित किमान दोन फळ खात जा याने हृदयविकारावर नियंत्रण राहील. पेरू असं किंवा स्ट्रॉबेरी, हे दोन फळ हृदयाच्या आरोग्यासाठी फार महत्त्वाचे मानले जातात.
सॅलेड
सॅलेड बनवण्यासाठी आपण गाजर, काकडी तसेच टोमॅटो यांचा वापर करतो. मुळात, या खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात खनिजे आणि जीवनसत्व असतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी फार महत्त्वाचे असतात. जर तुम्ही हृदयविकाराने त्रस्त आहात तर नक्कीच नियमितपणे दररोज सॅलेड खात चला.
ग्रीन टी
कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि रक्ताभिसरण सुधारण्यासाठी दररोज ग्रीन टी चे सेवन करत चला. फक्त हृदयविकार असणारे रुग्णच नव्हे तर कसलाही आजार नसणाऱ्या लोकांनीही दररोज ग्रीन टी चे सेवन करण्यात यावे. हृदयविकारासाठी नियमित पथ्य पाळणे गरजेचे असते जर काही त्रास जाणवल्यास किंवा डायट मध्ये बदल करायचा असल्यास पहिला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा नंतरच कोणत्याही गोष्टींचा किंवा खाद्यपदार्थांचा आपल्या नियमित सेवनात समावेश करावा.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हृदयरोगासाठी जोखीम ठरणारे घटक कोणते आहेत?
उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल, धूम्रपान, लठ्ठपणा, मधुमेह, कौटुंबिक इतिहास आणि वय हे जोखीम घटक आहेत.
हृदयविकाराची लक्षणे कोणती?
छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, घाम येणे, मळमळ होणे आणि हात, मान किंवा जबड्यात वेदना होणे ही लक्षणे असू शकतात.