Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वयाच्या ६० व्या वर्षांनंतर हेल्दी आणि आनंदी राहण्यासाठी फॉलो करा ‘या’ सवयी, तणावापासून मिळेल कायमची सुटका

वय वाढल्यानंतर आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. संतुलितव आहार, भरपूर पाण्याचे सेवन, व्यायाम करणे आवश्यक आहे. यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहील.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 23, 2025 | 11:50 AM
वयाच्या ६० व्या वर्षांनंतर हेल्दी आणि आनंदी राहण्यासाठी फॉलो करा 'या' सवयी

वयाच्या ६० व्या वर्षांनंतर हेल्दी आणि आनंदी राहण्यासाठी फॉलो करा 'या' सवयी

Follow Us
Follow Us:

मानसिक तणाव कमी करण्यासाठी उपाय?
वय वाढल्यानंतर आरोग्य बिघडण्याची कारणे?
निरोगी राहण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात?

वय वाढल्यानंतर महिलांसह पुरुषांच्या शरीरात अनेक बदल होतात. शरीरात होणाऱ्या बदलांमुळे पचनक्रिया मंदावणे, हाडांमध्ये वाढलेल्या वेदना, सतत चिडचिड, अशक्तपणा इत्यादी अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. शरीरसंबंधित वाढलेल्या आजारपणामुळे शरीर थकून जाते . सहज होणारी कामे करताना सुद्धा खूप जास्त वेळ लागतो. त्यामुळे वाढत्या वयात शरीर सक्रिय असणे आवश्यक आहे. त्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणे, शारीरिक हालचाली, योगासने किंवा ध्यान करणे आवश्यक आहे. ध्यान केल्यामुळे शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य सुद्धा कायमच निरोगी राहते. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. (फोटो सौजन्य – istock)

लघवीतून संपूर्ण रक्तात पसरेल जीवघेणे इन्फेक्शन! ऑफिसमधील ‘या’ चुकीच्या सवयींमुळे २८ वर्षीय महिलेचा मृत्यू

ज्येष्ठ नागरिकांसाठी ६० वय हा एक महत्त्वाचा काळ आहे, कारण वय वाढत असताना शरीर आणि मन दोघांनाही विशेष काळजीची आवश्यकता असते. यासाठी आनंदी आणि सक्रिय असणे आवश्यक आहे. निरोगी जीवनशैली, नियमित आरोग्य सेवा आणि सकारात्मक दृष्टिकोन राखून, वृद्धापकाळात चांगले आणि अधिक समाधानकारक जीवन जगता येते. यासाठी काही सोपे मार्ग जाणून घेऊया.

तणाव व्यवस्थापित करा :

तणाव व्यवस्थापित करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी ध्यान, संगीत थेरपी, बागकाम किवा धार्मिक/आध्यात्मिक उपक्रमांसाठी वेळ द्यावा. यामुळे मन शांत होईल आणि आनंद मिळेल.मानसिक तणाव कमी करण्यासाठी नियमित ३० मिनिटं व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायाम केल्यामुळे शारीरिक हालचाली सुधारतात आणि हाडांच्या वेदनांपासून आराम मिळतो. हलका व्यायाम करा. दररोज २०-३० मिनिटे चालणे, योगासने आणि प्राणायाम केल्याने लवचिकता टिकून राहते आणि रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे मानसिक ताण कमी होतो.

संतुलित आहार आणि पुरेशी झोप आवश्यक:

वयाबरोबर शरीराच्या गरजा बदलतात. म्हणून, आहारात पुरेशा प्रमाणात प्रथिने, हिरव्या भाज्या, डाळी आणि फळे यांचा समावेश असावा, जड, तेलकट किंवा जास्त गोड पदार्थ टाळा. चांगली झोप शरीराला पुनरुज्जीवित करण्याची आणि मानसिक शांती राखण्याची संधी देते. दररोज ६ ७ तास झोपा आणि झोपण्याची वेळ निश्चित ठेवावी.

हिवाळ्यात वाढलेला सर्दी खोकला बराच होत नाहीये? मग स्वयंपाक घरातील लसूणचे ‘या’ पद्धतीने करा सेवन, खोकला होईल गायब

भरपूर पाणी प्या आणि आरोग्य तपासणी आवश्यक :

पुरेसे पाणी न पिल्याने डिहायड्रेशन होऊ शकते. शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी, नारळ पाणी, सूप आणि हर्बल टी सारखे पर्याय उत्तम आहेत. नियमित वैद्यकीय तपासणी आणि रक्तदाब, साखरेची पातळी आणि कोलेस्टेरॉलचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. यामुळे वेळेत आजार टाळता येतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: To stay healthy and happy after the age of 60 follow these habits health care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2025 | 11:50 AM

Topics:  

  • Happy Lifestyle
  • Health Care Tips
  • Health Tips

संबंधित बातम्या

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी
1

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी

Sleep Talking: झोपेत लोक बडबडतात का करतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या सविस्तर
2

Sleep Talking: झोपेत लोक बडबडतात का करतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या सविस्तर

‘या’ फळांचे सेवन केल्यास वाढू शकतो Diabetes चा धोका, जाणून घ्या फळे खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत
3

‘या’ फळांचे सेवन केल्यास वाढू शकतो Diabetes चा धोका, जाणून घ्या फळे खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी
4

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.