Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

झणझणीत जेवणाचा बेत! पारंपरिक पद्धतीने घरी बनवा चमचमीत वांग्याचं भरीत; चव अशी की सर्वजण बोटंच चाटत राहतील

वांग अनेक पोषकतत्वांनी युक्त असत ज्यामुळे याचं सेवन आरोग्यासाठी फायद्याचं ठरतं. तुम्हाला जर वांग्याची भाजी खायला आवडत नसेल तर तुम्ही यापासून झणझणीत आणि सर्वांच्या आवडीचं वांग्याचं भरीत तयार करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 12, 2025 | 10:12 AM
झणझणीत जेवणाचा बेत! पारंपरिक पद्धतीने घरी बनवा चमचमीत वांग्याचं भरीत; चव अशी की सर्वजण बोटंच चाटत राहतील

झणझणीत जेवणाचा बेत! पारंपरिक पद्धतीने घरी बनवा चमचमीत वांग्याचं भरीत; चव अशी की सर्वजण बोटंच चाटत राहतील

Follow Us
Close
Follow Us:

वांग ही भाजी अनेक वेगवगेळ्या प्रकारे बनवली जाऊ शकते मात्र काहींना याची चव फारशी आवडत नाही. वांग्यामध्ये अनेक पोषक घटक असतात जे आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरतात अशात याचे सेवन आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरू शकते आणि म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी वांग्याची एक चविष्ट आणि पारंपरिक अशी रेसिपी घेऊन आलो आहोत जी तुम्ही एकदा चाखाल तर बोटंच चाटत राहाल.

चॉकलेट लव्हर्स… कधी Earthquake Cake खाल्ला आहे का? चवीने भरपूर घरीच करा तयार

वांग्याचं भरीत ही महाराष्ट्रातील पारंपरिक आणि लोकप्रिय भाजी आहे. विशेषतः ग्रामीण भागात ही भाजी खूप आवडीने खाल्ली जाते. भाजलेल्या वांग्यात कांदा, लसूण, मिरची, दही किंवा चिंच-गूळ घालून बनवलेले हे भरीत अतिशय चविष्ट लागते. हे भरीत गरम फुलक्यांसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाण्याची खास मजा आहे. वांग्याचं भरीत बनवण्यासाठी फारसे साहित्य लागत नाही आणि ते सहज उपलब्ध असते. चला तर मग पाहुया ही पारंपरिक रेसिपी.

साहित्य:

  • जाडसर मोठं वांगं – १
  • चिरलेला कांदा – १ मध्यम
  • हिरव्या मिरच्या – २-३ (चिरून)
  • ठेचलेली लसूण – ४-५ पाकळ्या
  • कोथिंबीर – २ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
  • मीठ – चवीनुसार
  • मोहरी – ½ टीस्पून
  • हिंग – एक चिमूटभर
  • हळद – ¼ टीस्पून
  • तेल – १-२ टेबलस्पून

साध्या भाजीला द्या शाही ट्विस्ट! घरी बनवा रिच आणि स्वादिष्ट Egg Nawabi; लज्जतदार चवीने सर्वच होतील खुश

कृती:

  • वांग्याचं भरीत बनवण्यासाठी सर्वप्रथम जाड मोठं वांग घ्या आणि त्याला छान धुवा
  • यांनतर वांगं गॅसवर किंवा थेट चुलीवर भाजून घ्या. पूर्ण भाजल्यावर थंड होऊ द्या आणि मग साले काढून आतील गर मऊसूत करावा.
  • भाजलेलं वांगं हाताने किंवा चमच्याने मॅश करा.
  • कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग आणि हळद घाला. मोहरी फुटल्यावर त्यात लसूण आणि हिरव्या मिरच्या घालून परतून घ्या.
  • आता त्यात कांदा घालून तो थोडासा पारदर्शक होईपर्यंत परतावा.
  • फोडणीमध्ये मॅश केलेलं वांगं घालून सगळं एकत्र परतून घ्या.
  • चवीनुसार मीठ घालून सजवण्यासाठी कोथिंबीर टाका.
  • वांगं व्यवस्थित भाजणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे चव खास लागते.
  • तुम्ही यात चिंच गूळ देखील वापरू शकता, यामुळे याची चव आणखीनच वाढेल
  • गरम गरम वांग्याचं भरीत तयार आहे! ज्वारीच्या भाकरीसोबत याला खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Traditional recipe know how to make spicy bangan bharta at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2025 | 10:12 AM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

बटाट्याचा मसालेदार सामोसा नाही तर हा आहे नूडल्सने भरलेला चायनीज सामोसा; नोट करा रेसिपी
1

बटाट्याचा मसालेदार सामोसा नाही तर हा आहे नूडल्सने भरलेला चायनीज सामोसा; नोट करा रेसिपी

Goan Fish Curry: रात्रीच्या जेवणासाठी झटपट बनवा चविष्ट गोवन फिश करी, नोट करून घ्या पारंपारिक रेसिपी
2

Goan Fish Curry: रात्रीच्या जेवणासाठी झटपट बनवा चविष्ट गोवन फिश करी, नोट करून घ्या पारंपारिक रेसिपी

पितृपक्षात नैवेद्यासाठी झटपट बनवा आंबट गोड आमसुलाची चटणी, चवीसोबत आरोग्यासाठी ठरेल गुणकारी
3

पितृपक्षात नैवेद्यासाठी झटपट बनवा आंबट गोड आमसुलाची चटणी, चवीसोबत आरोग्यासाठी ठरेल गुणकारी

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत ब्रेड पॅटिस, हिरव्या चटणीसोबत लगेच चविष्ट
4

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत ब्रेड पॅटिस, हिरव्या चटणीसोबत लगेच चविष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.