
Travel Trend 2026 : महागडे स्पॉट सोडून आता स्वस्त ठिकाणांकडे अधिक वळू लागलेत पर्यटक, जाणून घ्या कारण
Travel Tips : 30 ओलांडायच्या आत फिरून या ही सुंदर ठिकाणे, लाईफटाइम लक्षात राहील अनुभव
पूर्वी लोक पॅरिस, स्विझरलँडसारख्या परदेशी पर्यटनाचे स्वप्न पाहत होते पण अलिकडे त्यांच्या आवडीत काहीसा बदल घडून आला आहे. आता तरुणांना माँटेनेग्रोच्या शांत गल्ल्यांमध्ये, होइ आनमधील कंदील-प्रकाशित रस्त्यांवर आणि ल्युब्लियानाच्या नयनरम्य नदीकिनार्यात अधिक रस निर्माण झाला आहे. खरंतर हा ट्रेंड डुप कल्चरमधून आला आहे. जसं लोक कपडे खरेदी करताना महागड्या ब्रँड्सऐवजी स्वस्त पर्याय निवडतात त्याचप्रमाणे हा ट्रेंड प्रवासाच्या बाबतीतही हे बदल घडवून आणतो. महागड्या देशांऐवजी आता लोक कमी खर्चात उत्तम अनुभव देणाऱ्या ठिकाणांची अधिकतर निवड करत आहेत.
एका अहवालानुसार, जर लोकप्रिय ठिकाण सोडून लोकांनी दूसऱ्या कमी लोकप्रिय ठिकाणाची निवड केली तर त्यांच्या प्रवासाच्या खर्चात ३० ते ५० टक्क्यांची बचत होऊ शकते. यामुळेच अधिकाधिक लोक आता कमी लोकप्रिय ठिकाणांची अधिक निवड करत आहेत. जनरेशन झेडची मानसिकताही बदलली आहे. त्यांना आता इंस्टाग्रामवर फोटोज टाकण्यासाठी प्रवास करायचा नाहीये तर अस्सल आणि अनोखा अनुभव घेण्यासाठी प्रवास करायचा आहे. भारतातही अनेक पर्यटक आता ग्लॅमस ठिकाणे सोडून गावांकडील नैसर्गिक दृष्य पाहण्यात अधिक रस घेत आहेत.
हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की यामागे फक्त पैसे हे एक एकमेव कारण नसून एक चांगला अनुभव मिळवणे हा देखील आहे. बऱ्याचदा प्रसिद्ध ठिकाणी लोकांचा इतका घोळखा असतो की त्या ठिकाणाला नीट पाहता येत नाही, तिथे स्वत:चा असा मोकळा वेळ घालवता येत नाही. यामुळेच लोक आता हिडन लोकेशनला अधिक भेट देऊ लागले आहेत.