परदेशात फिरायला जाताय? या देशांमध्ये व्हिसाशिवाय येईल फिरता
सेलिब्रिटींच आवडतं ठिकाण म्हणजे मालदिव. विकेंड हॉलिडेला मजा मस्ती आनंदासाठी सेलिब्रिटी मालदिवला जाणं पसंत करतात. लक्ष्यद्विपपासून जवळ असलेल्या या देशाची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. इथे असलेले स्वच्छ समुद्रकिनारे हे पर्यटकांचं लक्ष वेधून घेतात. भारतीयांना मालदिवमध्ये फिरण्यासाठी व्हिसा अर्ज दाखल करण्याची गरज भासत नाही.
प्रचीन बौद्ध संस्कृतीचा वारसा आणि निसर्ग सौंदर्याचं लाभलेलं वरदान यामुळे थायलंड अनेकांना खुणावतो. भारतीयांना 15 दिवस व्हिसाशिवाय फिरण्याची परवानगी आहे.
इंडोनेशियातील बाली हे जागतिक पातळीवरील ट्रेकर्सच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू आहे. अनेक जगभरातील ट्रेकर्सना बालीच्या घनदाट जंगलात अॅडव्हेंचर करायला आवडतं. म्हणूनच जर तुम्ही परदेशात फिरायचा प्लॅन करत असाल तर इंडोनेशिया उत्तम ठिकाण आहे. तुमच्याकडे भारतीय असल्याचा पासपोर्ट असेल तर तुम्हाला तिथे व्हिसा मिळतो. त्यावरुन मनसोक्त फिरु शकता.
या देशातील इस्लामिक धार्मिक स्थळं आणि त्यांची संस्कृती जाणून घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात या देशात येत असतात. ईराणमध्ये भारतीयांना 15 दिवस व्हिसाशिवाय फिरण्याची परवानगी आहे.
स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांचा देश म्हणून पर्यटक मॉरीशसल कायमच पसंती देतात. मॉरीशसमध्ये फिरण्यासाठी जात असाल तर भारतीयांना 90 व्हिसाशिवाय फिरण्याची आहे.