कोणत्या बर्गरमुळे गेलाय लोकांचा जीव
भारतात गेल्या काही वर्षात बर्गर खाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. हे फास्ट फूड लहान मुलांनाच नाही तर अगदी तरूण, म्हाताऱ्यांनाही खूप आकर्षित करते. बर्गरसारखे फास्ट फूड खाण्याचे अनेक दुष्परिणाम होत असले तरी मॅकडोनाल्डच्या एका खास बर्गरचा संबंध ई. कोलायच्या संसर्गाशी जोडला जात असल्याचे आता समोर आले आहे. तुम्हाला हे वाचून नक्कीच धक्का बसेल.
अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये एकूण 49 लोक अचानक आजारी पडले, त्यापैकी काहींना रुग्णालयात दाखल करावे लागले आणि त्यापैकी एकाचा मृत्यू झाल्याचे सध्या वृत्त आहे. आता तुम्ही विचार कराल की याचा मॅकडोनाल्डच्या बर्गरशी काय संबंध तर जाणून घ्या (फोटो सौजन्य – iStock)
नक्की काय घडले
हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आलेल्या सर्व रुग्णांनी सांगितले की त्यांच्यापैकी बहुतेकांनी आजारी पडण्यापूर्वी मॅकडोनाल्डचा बर्गर खाल्ला होता. त्यानंतर बर्गर कंपनीने बाधित भागातील सुमारे 20 टक्के आउटलेटवर या उत्पादनाची विक्री तात्पुरती थांबवली असल्याचेही आता समोर आले आहे.
मॅकडोनाल्ड बर्गर खाण्यामागे खरोखरच या ई. कोलाय संसर्गाचे कारण आहे का आणि तसे असल्यास कोणत्या घटकाला संसर्ग झाला असावा, याचा तपास केला जात आहे. चला या प्रकरणाविषयी जाणून घेऊया आणि अधिक माहिती घेऊया की भारतात धोका आहे की नाही?
हेदेखील वाचा – ‘या’ कारणांमुळे पावसाळ्यात वाढते कानातील इन्फेक्शन, डॉक्टरांनी सांगितले कारण
कोणता बर्गर ठरतोय कारणीभूत?
कोणत्या बर्गरमुळे झालाय त्रास
U.S. Food & Drug Administration च्या माहितीनुसार, मॅकडोनाल्ड्सच्या Quarter Pounder Hamburger या बर्गरमुळे संसर्ग झाला असल्याचे समजण्यात येत आहे. मात्र, बर्गरच्या कोणत्या घटकामुळे संसर्ग झाला याचा सध्या तपास केला जात आहे कारण त्यात चिरलेला कांदा किंवा बीफ पॅटी जास्त असण्याची शक्यता आहे वर्तविण्यात येत आहे.
भारतालाही धोका?
सध्या, भारतात McD’s बर्गरशी संबंधित संसर्गाची अशी एकही घटना समोर आलेली नाही. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. भारतातील काही आउटलेट क्वार्टर पाउंडर नावाने बर्गर विकतात, पण त्यात बीफ पॅटी नसते ही बाब अत्यंत समाधानकारक आहे. परंतु तुम्ही फास्ट फूड किंवा फॅटी फूडचे सेवन कमी करावे. आरोग्य तज्ज्ञ हे आरोग्यासाठी हानिकारक मानतात आणि तसा सल्लाही वेळोवेळी देतात.
हेदेखील वाचा – पावसाळ्यात UTI आणि योनीमार्गाच्या संसर्गामध्ये वाढ, काय आहेत लक्षणे
CDC ने सांगितली लक्षणं
सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या मते, ई. कोलाय संसर्गामुळे निर्माण होणारे Shiga हे विष बहुतेक रुग्णांना आजारी पाडण्यासाठी जबाबदार आहे. हा जीवाणू शरीरात गेल्यानंतर साधारणपणे ३ ते ४ दिवसांनी लक्षणे दिसू लागतात. ती नक्की कोणती आहेत ते आपण जाणून घेऊया
CDC नुसार, बहुतेक रुग्ण 5 ते 7 दिवसात स्वतःहून बरे होतात. काही प्रकरणांमध्ये, हेमोलाइटिक युरेमिक सिंड्रोम सारख्या मूत्रपिंडाच्या स्थिती उद्भवू शकतात आणि त्यानंतर हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता असू शकते.
डॉक्टरकडे कधी जावे?
कोणती लक्षणे दिसल्यावर डॉक्टरकडे जावे
जंक फूडचा त्रास
जंक फूड खाण्याने आरोग्यावर खूपच वाईट परिणाम होतो आणि हे माहीत असूनही नियमित जंक फूड खाल्ले जाते. जंक फूडचे सेवन सतत करत असाल तर लठ्ठपणा, हाय कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड, हृदयाशी संबंधित आजार, उच्च रक्तदाबाचा त्रास, डायबिटीस, पोट फुगणे आणि अपचनाचा त्रास, खराब ओरल हेल्थ, चेहऱ्यावर मुरूमं येणे आणि मानसिक त्रास या सगळ्या समस्यांना सामोरं जावं लागते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.