पावसाळ्यातील UTI इन्फेक्शन (फोटो सौजन्य - iStock)
पावसाळ्यात मूत्रमार्गाचे संक्रमण (UTIs) आणि योनीमार्गाचे संक्रमणात वाढ होत असल्याचे दिसून येते. पावसाळ्यात केवळ जठरासंबंधी समस्याच उद्भवत नाहीत तर मूत्रमार्गाचे संक्रमण (यूटीआय) आणि योनीमार्गासंबंधीत संक्रमण देखील उद्भवते.
हवेतील ओलसरपणा आणि आर्द्रता जीवाणूंच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार करते, ज्यामुळे यूटीआय संसर्गाची शक्यता वाढते. याबाबत डॉ. किरण कोएल्हो, वरीष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ, लीलावती हॉस्पिटल यांनी अधिक माहिती दिली आहे.
UTI इन्फेक्शन म्हणजे काय?
युटीआय इन्फेक्शन म्हणजे नेमके काय (फोटो सौजन्य – iStock)
युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन किंवा युटीआय (UTI) अर्थात मूत्रमार्गाला होणारा विषाणू संसर्ग मूत्रमार्ग प्रणालीमधील मूत्रपिंड (किडनी), मूत्राशय (ब्लॅडर) आणि मूत्रमार्ग (युरेथ्रा) यापैकी कोणत्याही भागाला होऊ शकतो. लघवी सहसा निर्जंतुक असते. पण विषाणू मूत्रमार्गात प्रवेश करतात, तिथेच राहतात आणि वाढतात
काय आहेत लक्षणे?
UTI ची लक्षणे कोणती (फोटो सौजन्य – iStock)
यामुळे वारंवार लघवी होणे, लघवी होताना वेदना होणे, तीव्र वास येणे, ताप, ओटीपोटात वेदना आणि काही दुर्मिळ केसेसमध्ये लघवीमध्ये रक्त येणे यासारखी लक्षणे दिसून येतात. पुरुषांच्या तुलनेत महिलांना या संसर्गाचा धोका अधिक असतो. मोठ्या संख्येने महिलांना वारंवार युटीआयचा त्रास होऊ शकतो ज्यामुळे त्यांची मानसिक शांतता हिरावली जाते.
पावसाळ्यात अधिक त्रास
पावसाळ्यामुळे महिलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि त्यांना यूटीआय संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. अस्वच्छता, घट्ट तसेच सिंथेटिक पॅंटीजचा वापर, रसायनांनीयुक्त उत्पादनांचा वापर करणे हे युटीआय समस्येला आमंत्रण देऊ शकते. शौचालयाचा वापर केल्यावर स्त्रिया मागून पुढच्या बाजूस पुसतात तेव्हा आतड्यातील जीवाणू मूत्रमार्गात पसरतात. पावसाळ्यात यूटीआय संसर्ग टाळण्यासाठी अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया लीलावती हॉस्पिटलच्या वरीष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. किरण कोएल्हो यांनी स्पष्ट केले.
कसा करावा बचाव?
UTI इन्फेक्शन टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी (फोटो सौजन्य – iStock)