फोटो सौजन्य: Freepik
पावसाळ्यात अनेक आजार आपले डोके वर काढत असतात. दूषित पाणी, मच्छर आणि चुकीच्या खानपानामुळे हे आजरासोबतच, डोळे किंवा कानातील इन्फेकशन सुद्धा वाढण्याचा धोका असतो. यामुळेच अनेक लोकं पावसाळ्यात चिंताग्रस्त असतात. अशा परिस्थितीत, या इन्फेकशनपासून स्वतःचे संरक्षण करणे महत्वाचे आहे, अन्यथा अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
यासंबंधी आम्ही डॉक्टरांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला, ज्यात त्यांनी हे अशा प्रकारचे इन्फेक्शन का होतात व त्यावरील उपाय काय याबद्दल सविस्तर माहिती दिली.
पावसाळ्यात जास्त ह्यूमिडिटी आणि ओले वातावरणामुळे कानाला इन्फेक्शन होण्याचे प्रमाण सामान्य झाले आहे असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. कानाच्या संसर्गाचे मुख्य कारण म्हणजे कानाच्या ईअर कॅनलमध्ये जास्त ओलावा निर्माण होतो, ज्यामुळे बॅक्टेरिया आणि बुरशीची वाढ होऊ शकते.
रोग आणि संसर्गास कारणीभूत असलेले जंतू जास्त ह्यूमिडिटी आणि पाऊस असलेल्या ठिकाणी वाढतात. तसेच ते पाण्याच्या संपर्कात बराच काळ राहतात, ज्यामुळे कानाला इन्फेक्शन होऊ शकते.