डोकेदुखीवर नियंत्रणात मिळवण्यासाठी करून पहा 'हे' घरगुती उपाय
पावसाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये डोकेदुखीची समस्या उद्भवते. डोकं दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर बऱ्याचदा काहींना उलट्या किंवा मळमळ होण्याची शक्यता असते. तर काहींना सतत चक्कर येते. डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी अनेक लोक मेडिकलमधील गोळ्या औषधांचे सेवन करतात. मात्र या गोळ्यांचे सतत सेवन करणे आरोग्यासाठी धोक्याचे ठरू शकते. तात्पुरता आराम देण्याऱ्या पेनकिलरच्या गोळ्या किडनीच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण करतात. त्यामुळे डोके दुखी किंवा आरोग्यासंबंधित कोणत्याही समस्या उद्भवल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे. पित्ताचा त्रास किंवा अपुऱ्या झोपेमुळे अनेकांना डोके दुखीची समस्या उद्भवू लागते. तसेच मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्ही पाहत राहिल्यामुळे डोकं दुखणे किंवा डोकं जड होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला डोके दुखीच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
स्त्रियांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणं पुरुषांपेक्षा वेगळी का असतात? जाणून घ्या कारणं आणि खबरदारी
वारंवार डोके दुखीची समस्या उद्भवू लागल्यानंतर एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यावे. दिवसभरात दोन किंवा तीन वेळा लिंबाचा रस प्यायल्यास डोके दुखी कमी होऊन आराम मिळेल. यामुळे अपचनाची समस्या कमी होईल आणि डोके दुखी थांबेल. पोटात वाढलेल्या गॅसमुळे बऱ्याचदा डोके दुखू लागते.
डोकेदुखीवर अतिशय प्रभावी औषध म्हणजे पेपरमिंट ऑइल. पेपरमिंट ऑइलचा वापर करून हेड मसाज केल्यास मेन्थॉलमुळे रक्तवाहिन्या खुल्या होतात आणि थंडावा जाणवू लागतो. या तेलाने डोक्याची मालिश करावी.
कोमट पाण्यात आल्याचा रस आणि मध मिक्स करून प्यायल्यास डोके दुखीची समस्या कमी होईल आणि कायमचा डोकेदुखीपासून आराम मिळेल. आल्याचा चहा आरोग्यासंबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळवून देतो.
डोकेदुखी तात्काळ कमी करण्यासाठी गरम तव्यावर लवंग गरम करून रुमालामध्ये बांधून वास घेतल्यास डोकेदुखीपासून कायमचा आराम मिळेल. लवंग आरोग्यासंबंधित समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी मदत करते.
लघवीत येतोय फेस आणि बुडबुडे; वेळीच व्हा सावध! ‘या’ गंभीर आजाराचे असू शकते लक्षण
शरीरामध्ये कॅफेनचे प्रमाण वाढल्यानंतर बऱ्याचदा डोके दुखी किंवा डोकं जड होण्याची समस्या उद्भवते. त्यामुळे नियमित कमीत कमी प्रमाणात चहा किंवा कॉफी प्यावा.
डोकं दुखण्याचे एकमेव प्रमुख कारण म्हणजे डिहायड्रेशन. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर डोके दुखी किंवा डोकं जड होण्यास सुरुवात होते. त्यामुळे नियमित ७ ते ८ ग्लास पाण्याचे सेवन करावे. पाण्याच्या सेवनामुळे शरीर हायड्रेट राहते.
डोकेदुखी म्हणजे काय?
सर्वात सामान्य प्रकार, ज्याचे वर्णन बहुतेकदा कपाळावर किंवा डोक्याच्या मागील बाजूस मंद, वेदनादायक वेदना, घट्टपणा किंवा दाब असे केले जाते.
वेगवेगळ्या प्रकारच्या डोकेदुखीची लक्षणे कोणती?
तीव्र, धडधडणारे वेदना, बहुतेकदा डोक्याच्या एका बाजूला, मळमळ, उलट्या, प्रकाश आणि आवाजाची संवेदनशीलता. कपाळाभोवती, डोक्याच्या मागच्या बाजूला किंवा मानेभोवती मंद, वेदनादायक वेदना, घट्टपणा किंवा दाब.
डोकेदुखीसाठी काही घरगुती उपाय कोणते आहेत?
कपाळावर थंड कॉम्प्रेस किंवा मानेवर उबदार कॉम्प्रेस लावा. इबुप्रोफेन किंवा अॅसिटामिनोफेन मदत करू शकतात. कमी प्रमाणात, कॅफिन कधीकधी डोकेदुखी कमी करण्यास मदत करू शकते.