मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय
मासिक पाळीच्या चार किंवा पाच दिवसांमध्ये महिलांना शारीरिक आणि मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागते. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये पोट दुखी, कंबर दुखणे, डोकेदुखी, पेटके, पाठदुखी, मूड बदलणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. अपुरी झोप, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल, हार्मोन्स असंतुलन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम महिलांच्या मासिक पाळीवर दिसून येतो. त्यामुळे धावपळीच्या जीवनातून थोडासा वेळ आरोग्याकडे देणे सुद्धा गरजेचे आहे. अनेक महिला मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी या दिवसांमध्ये पेनकिलरच्या गोळ्या घेतात. पण पेनकिलरच्या गोळ्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत. त्यामुळे या गोळ्या खाण्याऐवजी घरगुती उपाय करून मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळवावा. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
लाईफस्टाईल संबधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
मासिक पाळी आल्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी कंबर दुखणे किंवा पोटात दुखणे इत्यादी समस्या जाणवू लागतात. या समस्या जाणवू लागल्यानंतर पोटावर गरम पाण्याच्या पिशवीने शेक घ्यावा. शेक घेतल्यामुळे पोटाच्या खालच्या भागाच्या स्नायूंना आराम मिळतो. शिवाय यामुळे रक्तभिसरण सुधारते आणि पोटात येणारे क्रम्प्स कमी होतात. नैसर्गिक उपाय केल्यामुळे लवकर प्रभाव दिसून येतो.
मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी आल्याच्या चहाचे किंवा आल्याचे सेवन करावे. यामुळे पोटदुखी आणि कंबर दुखीच्या वेदनांपासून तात्काळ आराम मिळतो. गरम पाण्यात आल्याचा तुकडा टाकून व्यवस्थित उकळवून घ्या. तयार केलेले पाणी दिवसभरातून दोन वेळा प्या. यामुळे वेदनांपासून आराम मिळतो.
हळदीचे दूध अनेक आजारांवर प्रभावी आहे. हळदीमध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म वेदना कमी करण्यास मदत करतात. शिवाय यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये एक ग्लासभर दुधात थोडीशी हळद टाकून मिक्स करा आणि दुधाचे सेवन करा. यामुळे वेदनांपासून आराम मिळेल.
जाड्या मिठाच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळण्यास मदत होते. यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्या. यामुळे कंबर दुखी आणि पाठदुखी थांबेल आणि आराम मिळेल.
लाईफस्टाईल संबधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
मासिक पाळीमध्ये योग्य प्रवाह न झाल्यामुळे महिलांना अनेक वेदना होऊ लागतात. या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी प्रवाह सुरळीत होण्यासाठी पपईचे सेवन करावे. पपईचे सेवन केल्यामुळे पाळीच्या वेदनांपासून आराम मिळण्यास मदत होते. शिवाय वेदनाही थांबतात.