हाडांमधील युरिक अॅसिड कायमचे होईल नष्ट! रोजच्या आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन
वय वाढल्यानंतर हाडांमध्ये वेदना होणे, हाडांमधून कटकट आवाज येणे, कंबर गुडघे दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक लोक दुर्लक्ष करतात. मात्र वारंवार हाडांमध्ये वाढलेल्या वेदनांकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. पायाच्या अंगठ्यात सूज, लालसरपणा, बोटांमध्ये अचानक वाढलेल्या वेदना किंवा किडनी स्टोन होण्यामागील प्रमुख कारण म्हणजे शरीरात वाढलेले यूरिक अॅसिड. शरीरात यूरिक अॅसिडची पातळी वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. यूरिक अॅसिड शरीरासाठी अतिशय हानिकारक आहे. शरीरातील प्युरिन तुटल्यामुळे यूरिक अॅसिड किडनीमधून मूत्रमार्गात जाऊन अडकते आणि काहीवेळा लघवीवाटे बाहेर पडून जाते. आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेले यूरिक अॅसिड कायमचे नष्ट करण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
काकडी खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. यामध्ये असलेले पाणी शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते. यूरिक अॅसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात कमीत कमी प्रमाणात प्युरीन असलेल्या भाज्यांचे किंवा पदार्थांचे सेवन करावे. शरीरात साचलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी काकडीच्या रसाचे सेवन करावे. यामुळे शरीरात साचलेले सर्व टॉक्सिन बाहेर पडून जातात. काकडीचे पाणी तयार करून तुम्ही ते दिवसभरात पिऊ शकता. काकडीचे पाणी तयार करताना एक लिटर पाण्यात काकडीचे तुकडे, लिंबाचे तुकडे आणि पुदिन्याची पाने टाकून नियमित सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतात.
रोजच्या आहारात विटामिन सी युक्त फळांचे आणि पदार्थांचे नियमित सेवन करावे. आहारात आंबट फळांचे सेवन केल्यास शरीरासह त्वचा आणि केसांना अनेक फायदे होतात. यूरिक अॅसिड वाढल्यानंतर ते बाहेर काढून टाकण्यासाठी आंबट फळांचे सेवन करावे. आंबट फळांमध्ये अॅन्टीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.
कायम निरोगी आणि हेल्दी राहण्यासाठी शरीराला पाण्याची जास्त आवश्यकता असते. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. नियमित २ ते ३ लिटर पाण्याचे सेवन केल्यास शरीर निरोगी राहील. शरीर आणि आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी गरम किंवा कोमट पाण्याचे सेवन करावे. भरपूर पाणी प्यायल्यामुळे किडनी सक्रिय राहते आणि आरोग्यासंबंधित कोणतेही आजार होत नाही.
‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे बिघडू लागते डोळ्यांचे आरोग्य, दृष्टी कमी होऊन डोळे होतील कमजोर
युरिक ऍसिडची पातळी वाढल्यास काय होते?
जर शरीरात युरिक ऍसिडची पातळी वाढली, तर ती सांध्यांमध्ये जमा होऊन गाउट नावाचा आजार होऊ शकतो. तसेच, किडनीमध्ये स्टोन होण्याची शक्यता देखील वाढते.
युरिक ऍसिड म्हणजे काय?
युरिक ऍसिड शरीरात तयार होणारा एक नैसर्गिक पदार्थ आहे. तो प्युरिन नावाच्या पदार्थांच्या विघटनातून तयार होतो, जे काही विशिष्ट पदार्थांमध्ये आढळतात. सामान्यतः, युरिक ऍसिड किडनीद्वारे फिल्टर होऊन लघवीद्वारे शरीराबाहेर टाकले जाते.
युरिक ऍसिडची पातळी किती असावी?
साधारणपणे, रक्तातील युरिक ऍसिडची पातळी 6.8 mg/dL पेक्षा कमी असावी.