'या' पदार्थांच्या सेवनामुळे बिघडू लागते डोळ्यांचे आरोग्य
धावपळीच्या जीवनशैलीमुळे कोणतीच व्यक्ती शरीराची योग्य काळजी घेत नाही. वाढत्या वयात शरीरात होणाऱ्या बदलांकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. आहारात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, सतत ऑफिसची काम, मानसिक तणाव, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. हल्ली प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यांवर चष्मा आहे. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चष्मा लावण्याची सवय असते. सतत मोबाईल पाहणे, तासनतास लॅपटॉपवर बसून काम करणे किंवा जवळून टीव्ही पाहणे इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम डोळ्यांच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे डोळ्यांची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. डोळ्यांची दृष्टी कमकुवत झाल्यानंतर अनेक समस्या उद्भवू लागतात.(फोटो सौजन्य – istock)
मान आणि पाठीमध्ये वारंवार वेदना होतात? गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी नियमित करा ‘ही’ योगासने
डोळ्यांची दृष्टी कमकुवत झाल्यानंतर सतत डोळ्यांमधून पाणी येणे, अंधुक दिसणे किंवा डोळ्यांसंबंधित इतरही समस्या उद्भवू लागतात. दैनंदिन आहारात खाल्ल्या सर्वच पदार्थांचा आरोग्यावर लगेच परिणाम दिसून येतो. त्यामुळे रोजच्या आहारात नेहमीच पौष्टिक आणि गुणकारी पदार्थांचे सेवन करावे. पण आहारात खाल्ले जाणारे हे पदार्थ डोळ्यांची दृष्टी अतिशय कमकुवत करून टाकतात. प्रामुख्याने जंक फूड, जास्त गोड पदार्थ किंवा तळलेले अन्नपदार्थ खाल्यामुळे आरोग्य बिघडून जाते.
दैनंदिन आहारात रिफाइंड पिठापासून बनवलेल्या पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. काहींना सकाळच्या नाश्त्यात सतत ब्रेड किंवा पास्ता खाण्याची सवय असते. पण हे पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. या पदार्थांच्या सेवनामुळे डोळ्यांची दृष्टी अतिशय कमकुवत होऊन जाते. याशिवाय रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढू लागते. त्यामुळे आहारात तुम्ही रव्यापासून बनवलेला ब्राऊन ब्रेड किंवा पास्ता खाऊ शकता.
सतत तेलकट, तिखट आणि जंक फूडचे सेवन केल्यामुळे शरीरासोबतच डोळ्यांचे आरोग्य सुद्धा बिघडून जाते. शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल डोळ्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होते. शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात. यामुळे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका वाढून डोळ्यांची दृष्टी कमी होऊन जाते.
Uric Acid वाढल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘हे’ बदल, दुर्लक्ष केल्यास उद्भवेल संधिवाताची समस्या
सतत गोड आणि बाहेरील कोल्ड्रिंकचे सेवांम केल्यामुळे रक्तात साखरेचे प्रमाण वाढते. शरीरात वाढलेला मधुमेह डोळे आणि इतर अवयवांना हानी पोहचवतो. त्यामुळे आहारात गोड पदार्थांचे सेवन करू नये. डोळ्यांशी संबंधित आजार, रेटिनोपॅथी इत्यादी आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या पदार्थाचे सेवन करावे.
डोळ्यांच्या सामान्य समस्या?
डोळ्यांमध्ये जळजळ, जळजळ किंवा किरकोळ खळबळ ही लक्षणे दिसून येतात. हे दीर्घकाळ स्क्रीनवर बसणे, कोरडे हवामान किंवा काही वैद्यकीय परिस्थिती यासारख्या विविध कारणांमुळे होऊ शकते.वाचन किंवा संगणक वापरणे यासारख्या दीर्घकाळ जवळून काम केल्यानंतर अनेकदा असे होते. डोळ्यांना थकवा येणे, डोकेदुखी आणि अंधुक दृष्टी ही लक्षणे आहेत.
डोळ्यांची काळजी घेण्यासाठी टिप्स?
कोणत्याही संभाव्य समस्या लवकर ओळखण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी, विशेषतः वयानुसार, नियमित डोळ्यांची तपासणी करणे अत्यंत महत्वाचे आहे. जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध संतुलित आहार तुमच्या डोळ्यांना वयाशी संबंधित आजारांपासून वाचवू शकतो.
विशिष्ट डोळ्यांच्या स्थिती:
डोळ्याच्या लेन्सवर ढगाळपणा येतो, ज्यामुळे दृष्टी अंधुक होते. उपचारांमध्ये सामान्यतः शस्त्रक्रियेद्वारे ढगाळ लेन्सऐवजी कृत्रिम लेन्स बसवला जातो. अशी स्थिती जी ऑप्टिक नर्व्हला नुकसान पोहोचवते, ज्यामुळे दृष्टी कमी होण्याची शक्यता असते. लवकर निदान आणि उपचार अत्यंत महत्त्वाचे आहेत.