टॅनिंग कमी करण्यासाठी तुरटीचा फेसपॅक
वय वाढत्यानंतर महिलांच्या शरीरासह त्वचेमध्ये सुद्धा अनेक बदल होऊ लागतात. चेहऱ्यावर वांग येणे, सुरकुत्या येणे, डाग आणि पिंपल्सचे फोड इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी अनेक महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन ब्रिटनिंग क्रीम्स, ग्लोइंग ट्रीटमेंट इत्यादी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. मात्र नाजूक त्वचेवर सतत केमिकल युक्त प्रॉडक्ट लावल्यामुळे त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते. वाढत्या वयात चेहऱ्यावर दिसू लागणाऱ्या सुरकुत्या लपवण्यासाठी अनेक महिला सतत मेकअप करतात. मात्र नेहमी नेहमी मेकअप केल्यामुळे त्वचा अधिक खराब आणि निस्तेज होऊन जाते.(फोटो सौजन्य – iStock)
चेहऱ्याचा फॅट कमी करण्यासाठी करा ‘हा’ व्यायाम; काहीच दिवसात मिळवा शार्प Jawline
त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळ्वण्यासाठी अनेक महिला तुरटीचा वापर करतात. मात्र चुकीच्या पद्धतीने तुरटीचा वापर केल्यास त्वचेमध्ये कोणतेच परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वाढत्या वयात तरुण दिसण्यासाठी तुरटीचा वापर कशा पद्धतीने करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. तुरटीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म भरपूर प्रमाणात आढळून येतात, ज्यामुळे त्वचेवरील डाग आणि सुरकुत्यांची समस्या कमी होईल. तुरटी त्वचेमध्ये बॅक्टरीया नष्ट करून हानिकारक पेशींपासून त्वचेचे रक्षण करते.
तुरटीचा वापर मुरुमांवर उपचार, त्वचेमधील छिद्र, त्वचा उजळ्वणे, सुरकुत्या कमी करणे इत्यादी अनेक कारणांसाठी केला जातो. तुरटीच्या वापरामुळे त्वचा अधिक उजळदार आणि सुंदर दिसू लागते. याशिवाय तुरटीमध्ये स्क्रबिंग गुणधर्म आणि पोटॅशियम आढळून येते, ज्यामुळे त्वचेमध्ये छिद्र स्वच्छ होतात आणि त्वचा निरोगी दिसते. आज आम्ही तुम्हाला तुरटीचा फेसपॅक कशा पद्धतीने तयार करावा, याची सोपी कृती सांगणार आहोत. या पद्धतीने तुरटीचा वापर केल्यास त्वचेवरील सुरकुत्या कमी होतील.
तुरटीपासून फेसपॅक तयार करण्यासाठी सर्वप्रथम, तुरटीची पावडर कोरफड जेलमध्ये मिक्स करून चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचा उजळदार होण्यास मदत होईल. याशिवाय त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारेल. तुरटीमध्ये असलेले पोटॅशियम पेरोक्साइड क्लींजर म्हणून त्वचेवर काम करते. यामुळे त्वचेच्या ओपन पोर्समध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ होते. याशिवाय चेहऱ्यावरील काळेपणा कमी होतो.
लिपस्टिक की मृत किड्याची पावडर? स्वस्तातल्या लिपस्टिक लावण्याआधी ‘हे’ नक्की वाचा
काळवंडलेला चेहरा पुन्हा उजळ्वण्यासाठी तुरटीचा वापर करणे अतिशय प्रभावी आहे. यासाठी तुरटीची पावडर तयार करून गुलाब पाण्यात मिक्स करा. तयार करून घेतलेली पेस्ट मानेवर आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसेच ठेवा. यामुळे चेहऱ्यावरील टॅनिंग कमी होईल आणि त्वचा उजळदार दिसेल. फेसपॅक चेहऱ्यावर लावून झाल्यानंतर हलक्या हाताने मसाज करून घ्या. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा.