फोटो सौजन्य - Social Media
चेहऱ्यावर जमा झालेली चरबी आपल्या संपूर्ण लुकला बिघडवत असते. चेहऱ्यावरील तेज अगदी नाहीसा करून टाकते. तसेच अनेकदा चेहऱ्यावर जमलेला फॅट एखाद्या आजारांविषयी आपल्याला सतर्क करत असतो. अशावेळी जर आपल्या चेहऱ्यावर फॅट दिसून येत असेल तर त्याला कमी करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणे फार गरजेचे असते. जर तुम्ही या समस्येला बळी जात असाल तर टेन्शन नॉट! असे काही व्यायाम आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपण आपल्या चेहऱ्यावरील फॅटला नाहीसे करून टाकू शकतो. मुळात, हे व्यायाम इतके सोपे आहेत कि यांना आपण घरच्या घरी करू शकतो. चला तर मग जाणून घेऊयात या व्यायामांबद्दल:
फेशिअल स्ट्रेच
आपल्या चेहऱ्याच्या मसल्सला टोन करण्यासाठी हा अतिशय उपयुक्त व्यायाम आहे. चेहऱ्यावर अतिरिक्त चरबी असण्याची समस्या असल्यास फेशिअल स्ट्रेच करा. फेशिअल स्ट्रेच करण्यासाठी आपल्या तोंडाला जितके शक्य तितके उघडा आणि जीभ बाहेर काढा. या पोजिशनमध्ये किमान १० सेकंड राहा आणि सामान्य अवस्थेत या. दिवसांतून किमान १० ते १५ वेळा हे केल्यास गाळाची आणि चेहऱ्याच्या खालील बाजूची चरबी कमी करण्यास बऱ्यापैकी मदत होईल.
गालांचा व्यायाम
हा व्यायाम करण्यासाठी तोंडामध्ये हवा भरा आणि या हवेला गालाच्या एका बाजूतून दुसऱ्या बाजूत न्या. किमान १ मिनिटांसाठी ही प्रक्रिया चालुद्या. यानंतर हवेला तोंडाच्या आत बाहेर करा. असे केल्याने चेहऱ्याचा फॅट तर कमी होईलच त्याचबरोबर मसल्सही मजबूत होतील.
जॉ Excercise
जबड्याचा व्यायाम शार्प Jawline मिळवण्यासाठी फार उपयोगी ठरतो. आधी सरळ अवस्थेत बसून घ्या. आपल्या जबड्याला पुढच्या बाजूला ढकला. किमान ५ सेकंड तसेच थांबून पुन्हा सामान्य अवस्थेत या. दिवसांतून १५ ते २० वेळा असे केल्याने डबल चीनची समस्या असल्यास कमी होते. तसेच जबड्याचा खालच्या बाजूस शार्प आकार बनण्यास सुरुवात होते.
ओठांचा व्यायाम
ऐकायला नवल वाटेल, परंतु ओठांचादेखील व्यायाम असतो. ओठांचा व्यायाम करताना ओठांना हसऱ्या अवस्थेत शक्य तितके लांब खेचा. यानंतर ओठांना गोलाकार अवस्थेत एकत्र आणा. या प्रक्रियेला १० ते १५ वेळांसाठी करा. याने ओठांसभोवतालच्या मांसपेशींना मजबुती मिळते.
चेहऱ्याचा व्यायाम
मानेकडे अतिरिक्त चरबी घालवण्यासाठी हा व्यायाम केला जातो. या व्यायामात आपण आपल्या चेहऱ्याला आरामात गोलाकार अवस्थेत फिरवतो. यादरम्यान आपले शरीर सरळ असले पाहिजे. चेहरा ५ वेळा उजवीकडील बाजूने फिरवा तर ५ वेळा डावीकडील बाजूने फिरवा. याने चार तसेच मानेवरील अतिरिक्त चरबी कमी होते आणि शार्प Jawline मिळवण्यास मदत होते.