स्वस्तातल्या लिपस्टिक लावण्याआधी 'हे' नक्की वाचा
भारतासह जगभरातील सर्वच महिला ओठांना वेगवेगळ्या शेड्स असलेल्या लिपस्टिक लावतात. लिपस्टिक लावल्यामुळे लुक पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकरचे लिपस्टिक शेड्स उपलब्ध आहेत. लाल, गुलाबी, जांभळा, ब्राऊन इत्यादी वेगवेगळ्या रंगाच्या शेड्समध्ये लिपस्टिक उपलब्ध आहेत. त्यात प्रामुख्याने लावला जाणारा लिपस्टिक रंग म्हणजे लाल. लाल रंगाची लिपस्टिक लावायला अनेकांना आवडतं. लाल रंगाच्या लिपस्टिकमध्ये अनेक वेगवेगळे शेड्स उपलब्ध आहेत. लाल रंगाची लिपस्टिक प्रामुख्याने पार्टीला जाताना किंवा वेस्टन कपडे परिधान केल्यानंतर लावली जातील.(फोटो सौजन्य – iStock)
सौंदर्य संसाधनांचा वापर महिला मोठ्या प्रमाणावर करतात. बाजारामध्ये गेल्यानंतर मुली महागड्या आणि स्वस्त अशा दोन्ही दर्जाच्या लिपस्टिक खरेदी करतात. मात्र लिपस्टिकमध्ये मेलेल्या किड्याची पावडर असू शकते का? हे ऐकून तुम्हाला सुद्धा धक्का बसेल. चला तर जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती.
लाल रंगाच्या लिपस्टिकमध्ये कर्माइन नावाचे रसायन आढळून येते. हे रसायन किड्यांपासून तयार केले जाते. कोचीनियल नावाच्या किड्याचा वापर करून हे रसायन तयार केले जाते. हा किडा स्टर्नोरायन्चा उपखंडामध्ये प्रामुख्याने दिसून येतो. लिपस्टिक बनवण्याआधी र्नोरायन्चा उपखंडातील किडा गोळा केले जातात. या किड्याना गरम पाण्यात टाकल्यानंतर त्यांचा मृत्यू होतो. त्यानंतर हे किडे वाळवण्यासाठी बराच वेळ कडक उन्हामध्ये ठेवले जातात.
स्वस्तातल्या लिपस्टिक लावण्याआधी ‘हे’ नक्की वाचा
किडे पूर्णपणे सुकल्यानंतर त्यांची पावडर तयार केली जाते. त्यानंतर तयार करून घेतलेली लाल पावडर सोडियम कार्बोनेटच्या द्रावणात व्यवस्थित उकळवून घेतली जाते. त्यानंतर तयार केलेले द्रावण गाळून त्याचे लहान आकाराचे तुकडे केले जातात. अशा पद्धतीने कर्माइन नावाचे घटक तयार केले जाते.
हार्ट अटॅकचा धोका वाढत आहे; शरीराच्या ‘या’ लक्षणांवरून वेळीच सावध व्हा, नाहीतर मृत्यूला बळी पडाल
लिपस्टिक तयार करताना अनेक कंपन्या कर्माइन या घटकाचा वापर करतात. मात्र तरीसुद्धा कर्माइन हा घटक आम्ही लिपस्टिकमध्ये वापरत नाही, असा दावा अनेक कंपन्यांनी केलेला आहे. नैसर्गिक रंगाचा वापर करून लिपस्टिक तयार केली जाते, असे सांगितले जाते. लिपस्टिक तयार करताना त्यात नैसर्गिक रंग वापरल्यास ते पानांफुलांपासून तयार केले जातात. मात्र हे रंग पानाफुलांपासून तयार न करता किड्यापासून तयार केले जातात. बाजारातील अनेक कंपन्या अजूनही लिपस्टिक तयार करण्यासाठी किड्यापासून तयार केलेल्या कर्माइन नावाच्या रसायनांचा वापर करत आहेत. यामध्ये अनेक ब्रँड कंपन्यांची सुद्धा नावे आहेत. त्यामुळे जर तुम्ही सुद्धा ओठांवर मेलेल्या किड्यापासून तयार केलेली लिपस्टिक लावत असाल तर वेळीच सावध व्हा.