केसांच्या वाढीसाठी जास्वंदीच्या फुलांचा 'या' पद्धतीने करा वापर
वातावरणातील बदल, आहारात सतत होणारे बदल, पोषणाचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यासह केसांवरसुद्धा लगेच दिसून येतो. केसांच्या वाढीसाठी महिला सतत काहींना काही करत असतात. सगळ्यांचं लांबलचक सुंदर केस हवे असतात. मात्र पोषक तत्वांचा अभाव निर्माण झाल्यानंतर केस गळण्यास सुरुवात होते. बऱ्याचदा एवढे केस गळू लागतात की केसांमध्ये टक्कल पडेल की काय अशी भीती मनात निर्माण होते. सतत केस गळल्यामुळे केसांच्या वाढीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – iStock)
केसांच्या निरोगी आणि लांबलचक वाढीसाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकल युक्त शँम्पू किंवा कंडिशनरचा वापर करतात. मात्र हे केमिकल प्रॉडक्ट केसांच्या मुळांवर गंभीर परिणाम करतात, ज्यामुळे केस गळणे, केसांची वाढ थांबणे, केसांमध्ये कोंडा होणे इत्यादी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला केसांच्या लांबलचक वाढीसाठी जास्वंदीचा कशा प्रकारे वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. जास्वदींच्या केसांच्या वाढीसाठी अतिशय प्रभावी आहे.
जास्वंदीच्या फुलांचा वापर केसांसाठी केल्यास केसांची वाढ झपाट्याने होते. याशिवाय केस गळतीच्या समस्येपासून आराम मिळतो. यासाठी ५ ते ६ जास्वंदीची फुले घेऊन स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर टोपात थोडस पाणी घेऊन त्यात फुले टाकून हातानी व्यवस्थित कुसकरून घ्या. त्यानंतर फुलांमधून चिकट पदार्थ जमा होण्यास सुरुवात होईल. जेल सारखा तयार झालेला पदार्थ गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्या आणि त्यात ॲलोव्हेरा जेल आणि थोडं तेल घेऊन मिक्स करा आणि स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा.
केसांच्या वाढीसाठी तयार करून घेतलेला जास्वंदीचा स्प्रे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केसांच्या मुळांवर मारून काहीवेळा तसाच ठेवून घ्या. त्यानंतर पाण्याने केस स्वच्छ धुवा. हा उपाय महिनाभर नियमित केल्यास केसांची वाढ होऊन केस सुंदर आणि चमकदार दिसू लागतील. जास्वंदी केसांच्या वाढीसाठी अतिशय प्रभावी आहे. हे जेल केस मऊ आणि मुलायम करण्यासाठी मदत करतो.जास्वंदीच्या फुलांमध्ये अँटीऑक्सिडंट्स केस मजबूत आणि मुलायम करण्यासाठी मदत करतात. जास्वंदीच्या फुलांमध्ये असलेले ऍमिनो ऍसिड आणि फ्लेव्होनॉइड्स केसांची गुणवत्ता सुधारतात. या फुलांचा वापर केसांसाठी केल्यामुळे केसांमधील कोंडा कमी होईल.