चेहऱ्यावरील हरवलेली चमक पुन्हा मिळवण्यासाठी आहारात करा 'या' पेयांचे नियमित सेवन
सर्वच महिलांना चमकदार आणि सुंदर त्वचा हवी असते. त्वचेची काळजी घेण्यसाठी महिला सतत काहींना करत असतात. कधी चेहऱ्यावर फेसपॅक लावला जातो, तर कधी फेसमास्क लावून त्वचेची काळजी घेतली जाते. पण सतत त्वचेवर कोणत्या ना कोणत्या प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे त्वचेची गुणवत्ता खराब होण्याची जास्त शक्यता असते. त्वचेवर ग्लो मिळवण्यासाठी वेगवेगळ्या केमिकल युक्त क्रीमचा वापर करण्याऐवजी अन्नपदार्थांचे सेवन करून आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. शरीरात पोषक घटकांची कमतरता निर्माण झाल्यानंतर त्वचा काळी पडणे, त्वचेवर पिंपल्स येणे, वांग, सुरकुत्या इत्यादी अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. या समस्या उद्भवू लागल्यानंतर आहारात बदल करून शरीराला पचन होणाऱ्या गुणकारी पेयांचे सेवन करावे.(फोटो सौजन्य – iStock)
त्वचेची काळजी घेताना स्किन केअर प्रॉडक्टचा जास्त वापर न करता खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करून आरोग्य सुधारण्यावर जास्त भर द्यावा. त्वचा टवटवीत आणि कायम फ्रेश, सकारात्मक ठेवण्यासाठी आहारात फळे, भाज्या आणि पौष्टिक पदार्थांचे नियमित सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला त्वचेवरील हरवलेली चमक पुन्हा मिळवण्यासाठी कोणत्या पेयांचे नियमित सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
काकडी आणि पुदिना शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करतो. रोजच्या आहारात नियमित काकडीचे सेवन केल्यास शरीरात थंडावा कायम टिकून राहील. काकडी पुदिन्याचा रस बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात काकडीचे तुकडे, पुदिन्याची पाने आणि काळ मीठ टाकून बारीक वाटून घ्या. त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून रस काढून गाळून घ्या. या रसाचे नियमित सेवन केल्यास शरीर कायम हायड्रेट राहील. यासोबतच त्वचेला सुद्धा फायदे होतील.
आवळ्यामध्ये असलेले विटामिन सी त्वचेसाठी अतिशय गुणकारी आहे. या रसाचे नियमित सेवन केल्यास शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील आणि शरीर स्वच्छ होईल. याशिवाय आवळ्याच्या रसात कोरफड मिक्स करून प्यायल्यास त्वचेवर नैसर्गिक ग्लो येईल आणि चेहरा सुंदर दिसू लागेल. मिक्सरच्या भांड्यात आवळा आणि कोरफड घेऊन बारीक वाटून घ्या. त्यानंतर तयार केलेला रस गाळून त्यात चवीनुसार चाट मसाला किंवा काळे मीठ टाकून सेवन करावे.
चेहऱ्यावर आलेले पिंपल्स आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी बीट गाजराच्या रसाचे सेवन करावे. बीट आणि गाजरचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात पाणी टाकून बारीक वाटून घ्या. वाटून झाल्यानंतर त्यात काळे मीठ टाकून नियमित सेवन करावे. शरीराची होणारी जळजळ कमी करण्यासाठी बीटच्या रसाचे सेवन करावे. यामध्ये भरपूर फायबर आणि विटामिन सी आढळून येते.