उन्हाळ्यात घामाच्या दुर्गंधीने त्रस्त आहात? 'या' पद्धतीने काखेमध्ये लावा तुरटी
उन्हाळा वाढल्यानंतर शरीरातील विषारी घामावाटे बाहेर पडून जातात. याशिवाय उन्हाळ्यात शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे खूप जास्त घाम येतो. सतत घाम आल्यानंतर शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते. शरीरातील पाणी कमी झाल्यानंतर डिहायड्रेशन, थकवा, डोकं दुखणे, अशक्तपणा इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे वाढत्या उन्हाळ्यात शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. सतत घाम आल्यानंतर शरीराला घामाचा वास येऊ लागतो. सतत येणाऱ्या घामाच्या वासामुळे काहीवेळा अंगावर रॅश येणे, त्वचा लाल होणे, सतत खाज येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी बऱ्याचदा महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या क्रीम काखेत आणून लावतात.(फोटो सौजन्य – iStock)
सतत येणाऱ्या घामाच्या दुर्गंधीमुळे काही वेळा महिलांचा आत्मविश्वास सुद्धा कमी होऊन जातो. त्यामुळे उन्हाळ्यात काखेतील काळेपणा आणि घामाच्या दुर्गंधीपासून आराम मिळवण्यासाठी तुरटीचा वापर करावा. तुरटीचा वापर केल्यामुळे त्वचा स्वच्छ आणि दुर्गंधीमुक्त होण्यास मदत होते. यामध्ये असलेले नॅचरल अॅंटी-सेप्टीक गुणधर्म शरीर कायम हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करतात. आज आम्ही तुम्हाला घामाच्या दुर्गंधीपासून आराम मिळवण्यासाठी तुरटीचा वापर कसा करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पद्धतीची वापर करून तुरटी काखेमध्ये लावल्यास काख स्वच्छ होईल.
सर्वप्रथम, वाटीमध्ये तुरटी घेऊन त्यात थोडस पाणी घालून भिजत ठेवा. तुरटी पूर्णपणे वितळाल्यानंतर तुरटीचे पाणी ब्रशच्या सहाय्याने दुर्गंधी येत असलेल्या अवयवांवर लावा. यामुळे शरीराला येणारी दुर्गंधी कमी होईल. काहीवेळ ठेवल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे शरीर स्वच्छ आणि शरीराला घामाचा वास येणार नाही.
काखेत वाढलेला काळेपणा आणि काखेतील दुर्गंधीपासून आराम मिळवण्यासाठी तुरटीचा वापर करावा. यासाठी वाटीमध्ये तुरटीचा बारीक तुकडा घेऊन त्यात पाणी घालून भिजत ठेवा. तुरटी व्यवस्थित भिजल्यानंतर ब्रशच्या मदतीने काखेतील काळेपणा तुरटी लावून ठेवा. त्यानंतर पाण्याने तुरटी स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय नियमित केल्यास काखेतील दुर्गंधी कमी होईल आणि काख स्वच्छ राहील.
बारीक करून घेतलेली तुरटीची पावडर वाटीमध्ये घेऊन त्यात पाणी घालून जाडसर पेस्ट तयार करा. तयार करून घेतलेली पेस्ट दुर्गंधी येत असलेल्या अवयवांवर आणि काळेपणा लावून काहीवेळ तशीच ठेवा. त्यानंतर पाण्याने स्वच्छ करून घ्या. हा उपाय आठवडाभर नियमित केल्यास काख स्वच्छ होईल आणि दुर्गंधीपासून सुटका मिळेल.