लिव्हरचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी लिंबाचा करा या पद्धतीने वापर
निरोगी जीवनशैली जगण्यासाठी शरीराचे सर्वच अवयव निरोगी असणे फार गरजेचे असते. त्यातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे यकृत. यकृताचे आरोग्य निरोगी असेल तर शरीराला फायदे होतात. यकृत शरीरातील विषारी आणि अनावश्यक पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करते. शिवाय पचनक्रियेस मदत करणे, जुन्या लाल रक्तपेशी बाहेर काढून टाकणे, चांगले कोलेस्ट्रॉल वाढवणे इत्यादी अनेक कार्य यकृत करते. पण यकृताचे आरोग्य बिघडल्यानंतर शरीराचे नुकसान होण्याची शक्यता असते. चुकीच्या आहारामुळे आणि जीवनशैलीमुळे यकृताचे आरोग्य बिघडते. यकृतासंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर या समस्यांना फॅटी लिव्हर असे बोलले जाते. सतत दारूचे सेवन केल्यामुळे लिव्हरचे आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला बिघडलेले लिव्हरचे आरोग्य सुधारण्यासाठी लिंबाचा वापर कसा करावा, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
यकृताचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी पदार्थ बाहेर पडून जाण्यास मदत होते. निरोगी आरोग्यसाठी इतर पेयांचे सेवन करण्याऐवजी पाण्याचे सेवन करावे. पाणी शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते. शिवाय यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडून जातात. शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता काकडी भरून काढते.
लोहयुक्त बीटचे दैनंदिन आहारात सेवन करावे. यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते शिवाय आरोग्याला अनेक फायदे होतात. बीटच्या रसाचे सेवन केल्यामुळे यकृताचे आरोग्य निरोगी राहते. बीटच्या रसात अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात आढळून येतात, ज्यामुळे यकृताचे नुकसान होत नाही. शिवाय शरीरातील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते.
विटामिन सी युक्त लिंबू आरोग्यासह त्वचा निरोगी ठेवण्यासाठी मदत करते.लिंबू पाण्याचे नियमित सेवन केल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात आणि आरोग्याला फायदे होतात. यकृताच्या निरोगी आरोग्यसाठी लिंबू पाण्याचे सेवन करावे. शिवाय दैनंदिन आहारात लिंबू पाण्याचा आणि लिंबाच्या रसाचा समावेश करावा.
निरोगी आरोग्यासाठी आलं अतिशय फायदेशीर आहे. आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात. शिवाय आल्याच्या पाण्यात अँटिऑक्सिडंट्स, ऑक्सिडेटिव्ह गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे शरीरातील ताणतणाव कमी होण्यास मदत होते. शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आल्याच्या पाण्याचे सेवन करावे. आल्याच्या पाण्यात हळद मिक्स करून प्याल्यास यकृताचे आरोग्य निरोगी राहील.
लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
डिटॉक्स ड्रिंक तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात आल्याचे तुकडे, लिंबाचा रस, कच्ची हळद आणि एक कप पाणी टाकून मिक्सरमधून फिरवून घ्या. त्यानंतर तयार केलेले पेय गाळून तुम्ही पिऊ शकता. यामुळे यकृताचे आरोग्य चांगले राहील आणि शरीराला अनेक फायदे होतील. दारू किंवा मद्यपान केलेल्या व्यक्तीचे लिव्हर खराब होऊ नये म्हणून आल्याचे डिटॉक्स ड्रिंक पिण्यास द्यावे.