Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आईच्या किडनीदानातून मुलाला मिळाले नवजीवन! ससून रुग्णालयात प्रत्यारोपण यशस्वी; मातृत्वाच्या त्यागाचे जिवंत उदाहरण

किडनी प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, रक्ताच्या नात्यातील व्यक्ती किडनी दान केल्यास प्रत्यारोपण लवकर होऊ शकते, असे डॉक्टरांनी सांगितले. हे ऐकताच आईने लगेच स्वतः किडनी दान करण्याचा निर्णय घेतला.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 01, 2026 | 11:53 AM
आईच्या किडनीदानातून मुलाला मिळाले नवजीवन! ससून रुग्णालयात प्रत्यारोपण यशस्वी

आईच्या किडनीदानातून मुलाला मिळाले नवजीवन! ससून रुग्णालयात प्रत्यारोपण यशस्वी

Follow Us
Close
Follow Us:

आईने आपल्या मुलाच्या भविष्यासाठी स्वतःची किडनी दान करून त्याला नवजीवन दिल्याची हृदयस्पर्शी घटना पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात घडली आहे. आर्थिकदृष्ट्या अत्यंत गरीब कुटुंबातील २२ वर्षीय तरुणावर ससून रुग्णालयात मदर टू सन लाईव्ह किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली असून, ही ससून रुग्णालयातील ३५ वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ठरली आहे. पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात विज्ञान शाखेतून पदवीचे शिक्षण घेणाऱ्या या तरुणाला जानेवारी २०२३ मध्ये उच्च रक्तदाबामुळे दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे निदान झाले होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ७जानेवारी २०२३ पासून त्याच्यावर डायलिसिस उपचार सुरू करण्यात आले. किडनी प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, रक्ताच्या नात्यातील व्यक्ती किडनी दान केल्यास प्रत्यारोपण लवकर होऊ शकते, असे डॉक्टरांनी सांगितले. हे ऐकताच आईने कोणताही विलंब न करता स्वतः किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. (फोटो सौजन्य – istock)

आतड्यांमध्ये जमा झालेला विषारी घटक एका झटक्यात पडून जातील बाहेर! नियमित करा ‘या’ फळाचे सेवन, त्वचेला होतील फायदे

किडनीरोगतज्ज्ञ डॉ. संदीप मोरखंडीकर व डॉ. निरंजन आंबेकर यांच्या सल्ल्यानुसार सर्व आवश्यक वैद्यकीय तपासण्या पूर्ण करून ससून रुग्णालयात प्रत्यारोपणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लपा जाधव, शल्यचिकित्साशास्त्र विभागप्रमुख डॉ. लत्ता भोईर तसेच मानवी अवयव प्रत्यारोपण कार्यक्रम प्रमुख डॉ. किरणकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार, दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.

या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत मेडिसिन विभागप्रमुख डॉ. हरिदास प्रसाद, पथक प्रमुख डॉ. हर्षल भितकर व त्यांची टीम, नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. निरंजन आंबेकर व डॉ. संदीप मोरखंडीकर, किडनी ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. सुरेश पाटणकर, डॉ. राजेश श्रोत्री, डॉ. हर्षद तोष्णीवाल, डॉ. विवेक बारेकर, व्हॅस्क्युलर सर्जन डॉ. शार्दूल दाते, भूलतज्ज्ञ डॉ. सुरेखा शिंदे, डॉ. सुजित क्षिरसागर तसेच परिचारिका व सहाय्यक कर्मचाऱ्यांचा मोलाचा सहभाग होता. संपूर्ण प्रक्रियेत समाजसेवा अधीक्षक व अवयव प्रत्यारोपण समन्वयक सत्यवान सुरवसे आणि प्रांजल वाघ यांनी रुग्णास दाखल करण्यापासून ते प्रत्यारोपण शस्त्रक्रियेपर्यंत समन्वयाची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

2026 मध्ये मिळवा चमकदार काचेसारखी त्वचा, आजच डाक्टर सेठी यांनी सांगितलेल्या या 5 वाईट सवयी सोडा आणि जादू पहा

खाजगी रुग्णालयात १० ते १५ लाखांचा खर्च:

खाजगी रुग्णालयांमध्ये किडनी प्रत्यारोपणासाठी १० ते १५ लाख रुपयांपर्यंत खर्व सांगण्यात आला होता. मात्र रुग्णाचे वडील बीव्हीजी ग्रुप अंतर्गत साफसफाईचे काम करतात आणि त्यांना केवळ १३ हजार रुपये मासिक वेतन मिळते. त्यामुळे एवढा मोठा खर्च करणे कुटुंबासाठी अशक्य होते. ससून रुग्णालयात किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत अत्यंत नाममात्र खर्चात केल्या जातात. योजनेबाहेरील काही औषधे, इंजेक्शन, सर्जिकल साहित्य व तपासण्यांचा खर्च सेवाभावी संस्थांच्या मदतीने उभारण्यात येतो.

Web Title: The son received a new lease on life through his mothers kidney donation the transplant was successful at sassoon hospital

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2026 | 11:53 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • Kidney Health Tips
  • Kidney Transplant

संबंधित बातम्या

हिवाळ्यात नियमित करा सुपरफूड मानल्या जाणाऱ्या शेंगदाण्याचे सेवन,शरीरात कधीच भासणार नाही रक्ताची कमतरता
1

हिवाळ्यात नियमित करा सुपरफूड मानल्या जाणाऱ्या शेंगदाण्याचे सेवन,शरीरात कधीच भासणार नाही रक्ताची कमतरता

लहान मुलं कायमच अशक्त आणि बारीक दिसतात? मग वजन वाढण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल फरक
2

लहान मुलं कायमच अशक्त आणि बारीक दिसतात? मग वजन वाढण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल फरक

घरात प्रसन्न वातावरण ठेवण्यासाठी धूप अगरबत्ती लावताय! अगरबत्तीमुळे उद्भवू शकतो कॅन्सरसारख्या ‘या’ गंभीर आजारांचा धोका
3

घरात प्रसन्न वातावरण ठेवण्यासाठी धूप अगरबत्ती लावताय! अगरबत्तीमुळे उद्भवू शकतो कॅन्सरसारख्या ‘या’ गंभीर आजारांचा धोका

वाढत्या वयात शरीरातील अवयव होतात म्हतारे! जाणून घ्या कोणत्या अवयवांची क्षमता वयासोबत कमी होऊन जाते
4

वाढत्या वयात शरीरातील अवयव होतात म्हतारे! जाणून घ्या कोणत्या अवयवांची क्षमता वयासोबत कमी होऊन जाते

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.