मानेवर वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी 'या' दोन घरगुती पदार्थांचा करा वापर
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये आरोग्यासोबत त्वचेची जास्त काळजी घ्यावी. चेहरा सुंदर दिसण्यासाठी महिला सतत काहींना करत असतात. मात्र मान आणि शरीराच्या इतर अवयवांवरील त्वचेची काळजी घेतली जात नाही. याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र मानेवरील त्वचेकडे दुर्लक्ष करू नये. बऱ्याचदा मानेवर वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी महिला सतत काहींना करत असतात. कधी ब्राइटनिंग क्रीम लावल्या जातात तर कधी बाजारात उपलब्ध असलेले वेगवेगळे प्रॉडक्ट वापरून त्वचेवरील काळेपणा घालवला जातो. मानेवर वाढलेला काळेपणा काहीवेळा नैसर्गिकरित्या सुद्धा होतो. अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करून त्वचेची काळजी घ्यावी.(फोटो सौजन्य – iStock)
सुंदर आणि चमकदार चेहऱ्यासाठी महिला सतत काहींना काही लावतात. मात्र काळवंडलेल्या मानेकडे व्यवस्थित लक्ष दिले जात नाही. काळवंडलेल्या मानेमुळे महिलानांचा आत्मविश्वास काहीसा कमी होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मानेवर वाढलेला काळेपणा घालवण्यासाठी कोणत्या घरगुती पदार्थांचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर आणि चमकदार होईल.
बेकिंग सोड्यामध्ये असलेले गुणधर्म त्वचा चमकदार आणि उजळदार करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे मानेवर वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. यासाठी वाटीमध्ये बेकिंग सोडा घेऊन त्यात गुलाब पाणी टाकून पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट काळवंडलेल्या मानेवर लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे मानेवर जमा झालेली डेड स्किन निघून जाण्यास मदत होईल. बेकिंग सोड्यात असलेले अँटी बॅक्टेरिअल गुणधर्म नॅचरल एक्सफोलिएटरप्रमाणे काम करतात. १० मिनिटं झाल्यानंतर पाण्याने मान स्वच्छ करून घ्या. हा उपाय नियमित केल्यास मानेवरील काळेपणा निघून जाईल.
बेसन, हळद आणि दही हे तीन पदार्थ त्वचेसाठी अतिशय गुणकारी ठरतात. या पदार्थांमध्ये आढळून येणारे घटक त्वचा आतून स्वच्छ करतात. यासाठी वाटीमध्ये एक चमचा बेसन घेऊन त्यात एक चमचा दही टाकून मिक्स करा. तयार केलेल्या पेस्टमध्ये चिमूटभर हळद मिक्स करून घ्या. तयार केलेला लेप संपूर्ण मानेवर लावून हलक्या हाताने मसाज करून घ्या. यामुळे मानेवर वाढलेले टॅनिंग कमी होईल आणि त्वचा सुंदर चमकदार दिसेल. १० मिनिटं मिश्रण मानेवर तसेच लावून ठेवा. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय आठवडाभर नियमित केल्यास मान स्वच्छ होईल.