उन्हाळ्यात त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी कलिंगडच्या सालीचा 'या' पद्धतीने करा वापर
उन्हाळ्यात सतत येणाऱ्या घामामुळे त्वचा तेलकट आणि चिकट होऊन जाते. याशिवाय कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर त्वचेची गुणवत्ता काहीशी खराब होऊन जाते. याशिवाय चेहरा काळा पडणे, त्वचेवर मुरूम किंवा पिंपल्स येणे, त्वचा रखरखीत होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. चेहरा काळा दिसू लागल्यानंतर बऱ्याचदा महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेतात. मात्र या ट्रीटमेंटचा ग्लो फार काळ चेहऱ्यावर टिकून राहत नाही. त्यामुळे त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी तुम्ही घरगुती पदार्थांचा वापर करू शकता. वाढत्या उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेताना योग्य ते स्किन केअर रुटीन फॉलो करणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – iStock)
उन्हाळ्यात डोळ्यांचे Infection वाढतोय झपाट्याने; सावधगिरी बाळगा! जाणून घ्या उपाय
कडक उन्हात बाहेर गेल्यानंतर त्वचेवर टॅनिंग वाढण्याची शक्यता असते. अशावेळी त्वचा थंड पाहिलं अशाच स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करावा. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी कलिंगडच्या सालीचा कशा प्रकारे वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे तुमची त्वचा कायम हायड्रेट राहील, याशिवाय त्वचेमधील ओलावा कमी होणार नाही. बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या क्रीम वापरण्यापेक्षा घरगुती पदार्थांचा वापर करून त्वचेची योग्य काळजी घ्यावी.
उन्हाळ्यात अंगाला सतत खाज येते? ‘हे’ घरगुती उपाय करून तात्काळ मिळवा आराम, घामोळं होईल गायब
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीर हायड्रेट आणि थंड ठेवण्यासाठी कलिंगडचे सेवन केले जाते. यामध्ये ९० टक्के पाणी आढळून येते. त्यामुळे उन्हाळा वाढल्यानंतर नियमित कलिंगड खावे. याशिवाय शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी कलिंगड खावे. याशिवाय कलिंगडच्या सालीमध्ये विटामिन ए, सी, बी६ आणि अँटी-ऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. चेहऱ्यावर आलेली सूज आणि जळजळ कमी करण्यासाठी नियमित कलिंगड खावे.