
यंदाच्या वटपौर्णिमेला नवऱ्यासाठी घ्या 'हे' खास उखाणे
सर्वच महिलांसाठी वटपौर्णिमा हा सण अतिशय खास आहे. यादिवशी नवविवाहित स्त्रीया दिवशी सुंदर तयार होऊन वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाच्या झाडाची पूजा करून नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते. याशिवाय सात जन्म हाच पती मिळवा म्हणून महिला प्रार्थना केली जाते. वडाच्या झाडाची पूजा करताना सर्वच महिला एकत्र येतात. एकत्र आल्यानंतर खूप गप्पा गोष्टी मारल्या जातात. याशिवाय महिला सुंदर सुंदर उखाणे घेतात. पूर्वीच्या काळापासून उखाण्यांमध्ये नवऱ्याच्या नावाचे नाव घेण्याची परंपरा आहे.त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वटपौर्णिमेनिमित्त नवऱ्याचे नाव घेण्यासाठी काही सुंदर उखाणे सांगणार आहोत. हे उखाणे तुम्हालासुद्धा खूप आवडतील.(फोटो सौजन्य – pinterest)
नाती जन्मोजन्माची, दिली परमेश्वराने जुळवून, लग्नाला माझ्या घरच्यांनी होकार नसता दिला, तर _________ रावांनी मला आणली असती पळवून.
मराठी सण म्हणजे, आनंदाचा क्षण,
_______ रावांचे नाव घेते, सुखी राहुदेत सर्वजण.
हृदयाचा ठोका, शरीराचा झोका,
आज वटपौर्णिमा आहे म्हणून, _____ रावांचे नाव घेण्याचा, भेटला मला मोका.
आज वाट पौर्णिमेचा सण म्हणून, मी नेसली सुंदर साडी,
____________ रावांचे नाव घेते, मला आवडली नारळाची वाडी.
पाच सुहासिनी स्त्रियांची, ओटी मी भरली,
_____ रावांचे नाव घेते, आज वटपौर्णिमा आहे म्हणून मी सजली.
तुटता तारा पाहून, माझी पूर्ण झाली आहे इच्छा,
____________ रावांचे नाव घेते, तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
यंदाची वटपौर्णिमेची तारीख आहे, 10 जून,
______________ रावांचे नाव घेते, पाटील घराण्याची सून.
वट सावित्रेला नमन करते, तुझ्या सृष्टी मुळे आनंदी आहे मनुष्य,
_____रावांचे नाव घेते, त्यांना मिळूदे १०० वर्ष आयुष्य.
शहा जहानने मुमताजसाठी, बांधला महाल ताज…..
रावांचे नाव घेते, वटपौर्णिमा आहे आज
फुलांच्या बागेत, फुलली मोहक शेवंती,
….राव सुखी राहावेत, हि परमेश्वराला विनंती.
वटपौर्णिमा आहे खरं तर, सुवासिणींसाठी मोठा सण,….
रावांनी जिंकले, पहिल्याच भेटीत माझे मन.
वटपौर्णिमा आहे खरं तर, सुवासिणींसाठी मोठा सण,
…रावांनी जिंकले, पहिल्याच भेटीत माझे मन.
हिमालय पर्वतावर, बर्फाच्या राशी,
….रावांचे नाव घेते, वटपौर्णिमेच्या दिवशी.
वडाची पूजा करून, गुंडाळते पांढरा धागा,….
रावांच्या आयुष्यात सदैव असू दे केवळ माझ्यासाठीच जागा
थाटात पार पडला आज वटपौर्णिमेचा सोहळा,….
रावांचे नाव ऐकण्यासाठी आज सर्वजण गोळा
Vat Purnima: वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाभोवती करा ‘ही’ परिक्रमा, वैवाहिक जीवन होईल सुखी
वटपौर्णिमेच्या दिवशी असते फणसाची खूप मागणी, ….
रावांची होईन मी साताजन्माची राणी